Sunday, July 22, 2012

संगीत विद्याहरण शताब्दी- नाट्यसंगीत मेजवानी


किर्लोस्कर नाट्यगृह (जुने) : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या "विद्याहरण'चा पहिला प्रयोग 1913 मध्ये पुण्यात झाला, त्या वेळचे हे दृश्‍य. डावीकडून स्त्री-वेशात बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे.
-----------------------------------------------

नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या संगीत विद्याहरण या नाटकाचे शताब्दी वर्ष जून २०१२ पासुन सुरु झाले. या निमित्ताने डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठा, नवी दिल्ली व पुणे शाखा याच्या वतीने या नाटकातील ३५ पदे सादर करण्याचा कार्यक्रम पुण्याच्या भरत नाट्य मंदीरात होत आहे.
पं. सुहास व्यास आणि कै.वसंतराव देशपांडे यांचे सुपुत्र विजय (बापू) देशपांडे यांच्या उपस्थितीत
२८ जुलै १२ रोजी सायं. ५ वाजता योजिलेल्या नाट्यसंगीताच्या मैफलीत पदे सादर करणार आहेत..
सुरेश साखवळकर, रवीन्द्र कुलकर्णी, सीमा रानडे, अतुल खांडेकर, अर्पिता वैशंपायन आणि कल्याणी पोतदार-जोशी.

महेश पाटणकर आणि अमृता मातवणकर हे सूत्रधार नटीच्या रुपात दिसणार आहे.

तर साथसंगत लाभणार आहे जयराम पोतदार ( यांची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि ऑर्गनॉस साथ). विद्यानंद देशपांडे (तबला) आणि व्हायोलीनची साथ आहे प्रमोद जांभेकर यांची.

contact_ Jayram Potdar, Pune
mob. 9326060075
MOb- 942294943001


लोकमान्यांचे शिष्य नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या लेखणीतून आकाराला आलेले... "विद्या मिळवा; पण परत मायभूमीत या' हा संदेश देणारे... पंडित भास्करबुवा बखले, बालगंधर्व या दिग्गजांच्या चालींनी सजलेले... आणि ब्रिटिशांच्या संस्कृतीवर टीका करणारे "विद्याहरण'... हे संगीत नाटक यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

आपली मुले परदेशात जातात. वेगवेगळ्या पदव्या घेतात आणि तेथील संस्कृतीला, राहणीमानाला प्रभावित होऊन ती तिथेच स्थायिक होतात... ही बहुसंख्य भारतीय तरुणांची मानसिकता आहे. यावर "विद्याहरण'च्या माध्यमातून खाडिलकरांनी भाष्य केले. "संगीत मानापमान'नंतर त्यांनी लिहिलेले हे दुसरे नाटक आहे. किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे ते 31 मे 1913 रोजी रंगभूमीवर आले. याचा पहिला प्रयोग पुण्यातच किर्लोस्कर नाट्यगृहात झाला. यात खुद्द बालगंधर्वांनी देवयानीची भूमिका, तर कृष्णराव गोरे यांनी शुक्राचार्याची भूमिका केली होती. गोविंदराव टेंबेंनी कच, तर गणपतराव बोडसांनी शिष्यवराची भूमिका साकारली होती. नाटकाचा विषय आणि या दिग्गजांच्या अभिनयामुळे "विद्याहरण'चे अल्पावधीतच अनेक प्रयोग झाले. पुढे विविध नाट्य कंपन्यांनी याचे प्रयोग केले.

Sunday, June 24, 2012

शास्त्रीय संगीताचा पदविका अभ्यासक्रम पुण्यात

आर्य संगीत प्रसारक मंडळाने शास्त्रीय संगीतातील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे.

या अभ्यासक्रमासाठी दहा वर्षे पूर्ण आणि पाचवी उत्तीर्ण अशी प्रवेश पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग आठवड्यातून तीन वेळा सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत असतील. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष पुरविता यावे, यासाठी एका वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या केवळ पाच एवढीच मर्यादित ठेवण्यात आली असल्याची माहिती सवाई गंधर्व संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद कंदलगावकर यांनी दिली.

भूप, यमन, भिमपलास असे काही महत्त्वाचे राग विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात शिकविले जाणार आहेत. नोट्ससह प्रसिद्ध कलावंतांनी सादर केलेल्या कला दृक-श्राव्य माध्यमातून पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे, असेही कंदलगावकर यांनी सांगितले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14379672.cms

Monday, June 11, 2012

’गोमंतकीय लोकसंगीत’ १७ जून

Maharashtra Cultural Centre presents
Sudarshan Sangeet Sabha - 12th episode
“Gomantakeeya LokSangeet”
A lecture demonstration on traditional folk music of Goa
Presenter: Mr. Rupesh Gavas
In this audio-visual presentation, Mr. Gavas will demonstrate
Mando, Dhalo-geet, Ghumat Aarti, Ganpati Naman,
Lagna-Geete, Dhanger-geet, various festival songs.
Musicologist Chaitanya Kunte will anchor the presentation.
Time & Date: Sunday, June 17th 2012, 11am
Venue: Sudarshan Rangamanch, Pune.
Entry passes will be available at venue half an hour prior the show.




’गोमंतकीय लोकसंगीत’
महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत ’सुदर्शन संगीत सभा’ उपक्रमाच्या १२व्या भागात ’गोमंतकीय लोकसंगीत’ या विषयावर गोव्यातील गायक, संगीताभ्यासक श्री. रुपेश गावस सप्रयोग व्याख्यान देतील. त्यांच्याशी संगीतकार चैतन्य कुंटे संवाद साधतील. गोव्यातील पारंपरिक लोकसंगीतातील धालोगीत, घुमटआरती, नमन, लग्नगीते, मांडो, धनगरगीत, सणांची गीते, शिमग्याची गाणी व नृत्यसंगीत यांची ध्वनिमुद्रिणे, चित्रणे यांच्या आधारे हे सादरीकरण होईल. रविवार, दि. १७ जून २०१२ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. प्रवेशिका अर्धा तास आधी उपलब्ध होतील.

Wednesday, June 6, 2012

'पाऊसवाट` मधून मला जीवनाच्या हाका ऐकू आल्या



द.भिं.चे स्पष्ट मत

`प्रत्येकामध्ये एक स्पंद असतो, तो स्पंद म्हणजे वाड़मयीन आत्मनिष्ठा. केदारच्या लेखनामध्ये चिंतन, संवेदना आणि कल्पकतेचे स्पंद आहेत. हे वाचत असताना मला त्यातून जीवनाच्या हाका ऐकू आल्या,-'पाऊसवाट - एक कोलाज' या पुस्तकाचे प्रकाशन करताना द.भि.कुलकर्णी यांनी हे स्पष्टपणे मान्य केले.

केदार केसकर यांनी लिहिलेल्या व कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'पाऊसवाट - एक कोलाज' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. ३ जून २०१२ रोजी ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्त झाले. प्रकाशनाचे अध्यक्षस्थान संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनी भूषविले. डॉ. शोभा अभ्यंकर या वेळी प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. सुधीर मोघे, मंगला गोडबोले, पं. संजीव अभ्यंकर, आसावरी काकडे असे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.


आनंद मोडक म्हणाले, उत्कटतेची तहान केदारला रसरशीतपणे व्यक्त होण्यास भाग पाडत आहे. ही अपूर्णता आणि अस्वस्थता अशीच राहिली तरच कलावंतामधील लसलसता कोंब वाढत राहिल.

देवयानी कुलकर्णी - अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले.

Wednesday, May 30, 2012

`आरोग्य संगीत`-सुरेल,दर्जदार आणि वेगळा


जिवनात संगीताचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आणि हाच विषय घेऊन `आरोग्य संगीत` या कार्यक्रमाचे `सांस्कृतिक पुणे`च्या वतीने नुकतेच पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले. कोल्हापूरचे श्री. दिलिप गुणे यांच्या या संकल्पनेवर आखलेला हा अत्यंत सुरेल व दर्जदार होता यात शंकाच नाही. एक वेगळा आणि कोल्हापूरातल्या या कलावंताचा आविष्कार अनुभवण्याची संधी या निमित्ताने आली याचा अधिक आनंद होतो. विविध राग घेऊन त्यावर विशिष्ट रागाचा त्या त्या रोगासाठी होणार उपयोग सांगत हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार झाला.

बैरागी भेरव- या रागातील वैराग्याची भावना.
अहिर भैरव मधिल आर्त स्वर ह्दयरोग आणि उच्चरक्तदाब नियंत्रणासाठी उपयोगी असणारा.
शिवरंजनी- सोरायसिस वर उपयोगी
मधुवंती-कफ कमी होण्यासाठी
पहाडी – जुनाट सर्दी, कफ, खोकली यासाठी उपयुक्त
यमन- नेराश्य, मनोविकार आणि आमवातावर गुणकारी, डिप्रेशन, हार्मोनल असंतुलन.
सारंग- हायपर टेन्शन
भिमपलास- मनाच्या शांततेसाठी
हंसध्वनी- निद्रनाश, मानसिक दबाव यासाठी उपयुक्त.

अशा रागांनी अनेक रोगावर उपचार होऊ शकतो. याबाबतचे वैद्यकीय विवेचन केले डॉ. केतकी कौजलगी यांनी...तर वेगळ्यापध्दतीचे निवेदन करून या कार्यक्रमात अनेक विध रांगांशी संबंधीत आणि संगीताविषयक माहिती आपल्या प्रभावी शब्दातून व्यक्त केली ती मंगेश वाघमारे यांनी.

एक वेगळ्या प्रकारचा सांगेतिक अनुभूती यातून रसिकांना मिळाली.

गायक प्रल्हाद जाधव आणि गायिका स्वाती नाकील यांनी ओंकार स्वरुपा, अलबेला साजन आयो, सांज ढले गगन तले.. अशी अनेक गीते आपल्या सुरेल आवाजात सादर केली.

या कार्य़क्रमाचे संगीत संयोजक आणि बासरी वादक सचिन जगताप यानी स्वतःला मधुमेह असुनही राग संगीताने आपल्यावर काय परिणाम झाला ते सांगून याचे महत्व पटवून देताना..स्वतःच्या कलेचा सुंदर पगडा सर्वकार्य़क्रममभर सहजपणे मिरविला. व्हायोलीन व सतार वादक केदार गुळवणी आमि सचिन जगताप यांनी बहारोंसे फूल बरसाओ, जाने कहॉं गये वो दिन, लग जा गले, जा रे हट नटखट, गोविंदा आला रे , तुम पास आये, सायोनारा, पंख होते तो.. अशी एकाहून एक सरस गीते सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली.

तबल्याची साथ करणारे प्रशांत देसाई. ढोलक, ढोलकी व साईड रिदमवर सचिन पन्हाळकर. ऑक्टोपॅडची साथ करणारे किरण ठाणेदार. सिंथेसायझरसाठी शिवाजी सुतार या सर्वच कोल्हापूरच्या कलावंतांनी कार्यक्रमाची रंगत अधिक वाढविली. याचे दुसरे एक वैशिष्ठ्य म्हणजे, केवळ गाणी..राग नव्हे..तर तालवाद्यातून विविध सुरावटी सादर करुन कार्यक्रमाचे वेगळेपण जपत वादनाची कमालही अनुभवायला मिळाली.

सर्वच कलाकारांच्या एकत्रित वादनामध्ये अत्यंत सुसूत्रता, वादनातील सच्चेपणा, सुरेलपणा, आपलेपणा खरंच वाखाणण्याजोगा होता.

कोल्हापूरच्या `फायटो फार्मा आर्ट सर्कल` आयोजित आणि `संस्कार जीवनगाणे` प्रस्तुत `आरोग्य संगीत` या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. दिनेश गुणे यांची होती..

या सुरेल कार्यक्रमासाठी `सांस्कृतिक पुणे`चे सुभाष इनामदार यांचे मोलाचे सहाकार्य लाभले.



सौ. चारुशीला गोसावी, पुणे

charusheelagosavi@gmail.com

Wednesday, May 9, 2012

`मुक्ताई- एक मुक्ताविष्कारचा` दोनशेवा प्रयोग मंगळवारी




बारावर्षापूर्वी सुरु केलेला हा एक मुक्ताविष्कार आजच्या टप्प्यावर दोनशेव्या प्रयोगापर्यतची वाटचाल यशस्वी करत आहे. प्रचिती प्रशांत सुरु हा मुक्ताईच्या भूमिकेतून मुक्ताईच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून सांगत तिच्या श्रेष्ठत्वाची कहाणी या सादरीकरणात कथीत करतात. अवघे अठरा वर्षाचे आयुष्य लाभलेली ही मुक्ताई...सर्वांच्या दृष्टीने अलोकिक आहे. मुक्ताईचा संपूर्ण जीवनपटच यातून सिध्द होतो.
मंगळवार दि. १५ मे २०१२ला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुक्तनाट्याचा प्रयोग भरत नाट्य मंदिरात संध्याकाळी सहा वाजता होत आहे. `मुक्ताई`च्या डिव्हीडीचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकरांच्या हस्ते होणार आहे.
मुक्ताईचे संहिता लेखन केले आहे वैद्य सौ. प्रफुल्लता सुरु यांनी तर दिग्दर्शन संकल्पना आहे वैद्य प्रशान्त अ. सुरु यांची. भारतभर अनेकविध ठिकाणी या मुक्तआविष्काराचे प्रयोग तर झालेच पण पाच खंडातही याची प्रतिती अनेक रसिकांनी घेतली आहे.
ज्या पुण्यातल्या भरत नाट्य मंदिरात २९ मे २००० ला पहिल्या प्रयोगाची नांदी झाली त्याच भरत मध्ये दोनशेवा प्रयोग होणे हे भाग्यच. मंगळवारी होणारा हा प्रयोग सर्वासाठी विनामूल्य आहे.

Saturday, April 14, 2012

कोल्हापूरात जेव्हा व्हायोलीन गाऊ लागते...

सांस्कृतिक पुणे आयोजित ..व्हायोलीन गाते तेव्हा....कोल्हापूरातील शुभारंभ...८ एप्रिल २०१२ केशवराव भोसले नाट्यगृहात सादर झाला... पुण्याच्या प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांनी आपल्या वाद्यावरची हुकमत अशी काही दाखविली की सारे श्रोते प्रसन्न होऊन टाळ्यांनी दाद देत होते..


   


तबला- रविराज गोसावी, साईड रिदम- राजेंद्र साळुंके, सिंथेसायझर- अमृता दिवेकर आणि निवेदक होते पुण्याचे आनंद देशमुख