Saturday, November 29, 2014

जयश्री पाटणेकरांच्या यमन रागाने जिंकले

बासरी फाउंडेशन..आरती आणि सुयोग कुंडलकर  यांनी या फाउंडेशनची स्थापना केली आहे..त्यांचा पहिला कार्यक्रम शुक्रवारी एस एम जोशी सभागृहात उत्तरोत्तर रंगत गेला..आरंभी आरती ठाकूर-कुंडलकर यांनी भीमपसाल राग सादर करताना आपल्या नितळ ,कोमल आणि तेवढ्याच निकोप स्वरसमुहातून रागाची मांडणी करुन श्रोत्यांना आपलेसे केले.. साथीची तेवढीच उत्त्यातमोत्तम संगीत हार्रमानियमवर सुयोग कुंडलकर यांनी केली..तर तबल्यावर आपला अनुभवी हात फिरवत भरत कामत यांनी तालावरची आपली ताकद सहजी दाखवत राग तालबद्ध केला.
 मध्यंतरानंतर व्यासपीठावर दाखल झालेल्या ज्येष्ठ गायिका जयश्री पाटणेकर यांचा साधेपणा अधिक भावला..मग त्यांचे गायन.

ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याची तालिम घेऊन त्यावर स्वतःची घेतलेली मेहनत त्यांच्या यमन रागातून सहीसही उतरलेली पुणेकर रसिकांनी अनुभवली. त्यानाही साथसंगत सुयोग कुंडलकर आणि भरत कामत यांची लाभली..
आश्वासक कलावंतांचे कार्यक्रम करण्याचा मानस संस्थेने या पहिल्याच संगीत सभेच्याव्दारे सिध्द केला.
आरंभी सांगताना निवेदक आनंद देशमुख यांनी बासरी या संस्थेची माहिती दिली..त्यात या फाउंडेशनच्या माध्यमातून आज २५ विद्यार्थी गायन- हार्मोनियम वादनाचे धडे घेत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या कार्यशाळी, संस्थेकडे असेलेल्या दुर्मिळ ध्वनी, चित्रफितीतूनही मार्गदर्शन मिळवित आहेत.विद्यार्थी आणि रसिकांसाठी  उत्तमोत्तम गाणे..संगीत ऐकण्याचे कार्यक्रम करणे हाही संस्थेचा उद्देश असल्याचे म्हटले आहे.  नवोदित आश्वासक कलाकार आणि बुजुर्ग काकारींच्या गायन वादनाचे कार्यक्रम करणे.. आरती ठाकूर यांच्या पहिल्या गुरु लीलाताई घारपुरे यांच्या स्मतीदिनानिमित्ताने संगीत सभेच आयोजन करणे. तसेच सुयोग यांच्या गुरु रंजना गोडसे यांच्या स्मृतीदिनिमित्ताने हार्मानियम वादनाची मैफल करणे..असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

या कार्यक्रमाला किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक- सवाई गंधर्व यांचे शिष्य पं. फिरोज दस्तुर यांच्या नावाने चालविल्या जाणा-या मेमोरियल फाउंडेशनचा सकीय आणि आर्थिक सहभाग मिळाला होता..