Saturday, August 1, 2015

सुवर्णकांती लाभलेला गजलकार- रमण रणदिवे



जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणार्‍याने जगता जगता मजेत गावे गाणे

आयुष्याच्या वेलीवरती भावफुले बहरावी
ती वेचाया अलगद खाली नक्षत्रे उतरावी
नक्षत्रांच्या श्वासांतुनही पेरित जावे गाणे

पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत सार्‍या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे

जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला
इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला
जाता जाता दुनियेसाठी उधळून जावे गाणे



मराठी गजल क्षेत्रात आपल्या गजलेचा ठसा मराठी मनावर उमटविणारा गजलकार रमण रणदिवे..

आपल्या कारकीर्दीची पन्नाशी त्यांनी साजरी केली तेही माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते काव्यजीवन पुरस्कार स्विकारून..

हे भाग्य लाभले ते या मनासारखी कवीता अजुनही लिहता आली नाही हे नम्रपण सांगणारा ..मातीवर पक्के पाय ठेऊन..समाजात आनंदाबरोबर दुःखाचे क्षण टिपणारा.....रमण रणदिवे ....या गजलकाराच्या दृष्टीने.
कलावंताला चार प्रकारे आपले कलाजीवन फुलवावे लागते ..हे सांगताना..रियाज, साधना, सिध्दी आणि सर्वात शेवटी येते..ति प्रसिध्दी....असा तो प्रवास डोळसपणे सांगणारा मोठ्या मनाचा माणूस शोधणारा..माणसात देव शोधणारा कवी..रमण रणदिवे..
शनिवारी सकाळी ११ वाजता रंगत-संगत आणि श्यामची आई प्रतिष्ठानच्यावतीने सुशिलकुमारजींच्या हस्ते रमण रणदिवे यांना काव्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला...
यावेळी त्यांनी वडील..जे कवी होते..दुसरे सुरेश भट आणि तिसरे  सुरेशचंद्र नाडकर्णी..या तीन गुरुंची आठवण रसिकांना करुन दिली..

जगाला झालेल्या जखमा आपल्या मनावर वागविणारा  आणि समाजाला सावधगिरीचा इशारा आपल्या शब्दातून देणारा..हा कवी असतो..हे त्यांना आवर्जुन ठामपणे सांगितले..

आशय घेऊन सांगणारा कवी म्हणून सुशिलकुमारांनी आपल्या सोलापूरच्या या कवीचे कौतूक केले..
यावेळी शर्वरी जेमिनिस यांनी रणदिवे यांच्या काही कविता सादर करुन त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटवून दिली..
पद्मश्री पं. सुरेश तळवलकांनीही या कवीचा सन्मान अपल्या अभ्य़ासू भाषणातून केला.

अगदी वेगळ्या वेळी सकाळ असूनही पुण्याच्या  महाराष्ट्र साहित्य  परिषदेच्या सभागृहातील दर्दी आणि रसिकप्रिय धुरंदरांची गर्दी सारे काही सांगून जाते..

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:

Post a Comment