Monday, August 3, 2015

संगीत नाटकांच्या अभ्यासाठी पुण्यात केंद्र होण्याची गरज

संगीत नाटके आता लुप्त होत आहेत..पण अशा कार्यक्रमातून त्या दीडशे वर्षांच्या परंपरेला पुन्हा रसिकांसमोर सादर केले जात असून.. त्याला प्रतिसादही उत्तम मिळत आहे..संगीत नाटक ही आपल्या मराठी रंगभूमीची खाक देणगी आहे. ती नाटके पुन्हा पहायला रसिकांना आवडते..ती नाटके जतन करुन त्यांचा अभ्यास व्हायला हवा..संगीत नाटकांचा अभ्यास करण्यासाटी पुण्यात त्याचे केंद्र निर्माण होण्याची गरज आहे..तशी मी विनंतीही मी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे..संगीत अभ्यासक आणि शास्त्रीय संगीताचे गायक पं. विकास कशाळकर यांनी यावेळी बोलत  होते.


ख्यातकिर्त गायक  डॉ. वसंतराव देशपांडे यांची ३२ वी पुण्यतिथी, नटसम्राट बालगंधर्व यांची ४८ वी पुण्यतिथी, तसेच नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिशताब्दीचे निमित्त साधून डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे  संगीत संशयकल्लोळ चा कथामय नाट्याविष्कार पुण्यात रविवारी साजरा झाला. पद्मश्री तालयोगी सुरेश तळवलकरयांच्या हस्ते , डॉ. विकास कशाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संशयक्ल्लोळ नाटकातील पदे सुचेता अवचट, किशोरी जानोरकर, ऋषिकेश बडवे, हेमंत पेंडसे यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यांना पं. जयराम पोतदार- हार्मोनियम आणि नीलेश रणदिवे -तबला यांनी  साथसंगत केली. 
 अशोक अवचट आणि अनुराधा राजहंस यांनी नटी सूत्रधाराच्या वेषात संशयकल्लोळ नाटकाचते कथानक सांगत त्यातल्या पदांना सुरवात करून दिली. संगीत नाटकांची केवळ आठवण यातून होते..त्यातली पदे मैफलीच्या स्वरूपात इथे सादर होतात..इतकेच..

नाट्यसंगीतातून शास्त्रीय संगीत हे सूक्ष्मपणे झिरपत आले आहे. शास्त्रीय संगीताचेच एक रूप असणाऱ्या नाट्यसंगीताने रसिकांची ज्ञानसंपदा वृद्धिंगत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गेल्या अनेक वर्षांत पार पाडली आहे. ते आपण जपायला हवे असे मतही पं. सुरेश तळवलकर यांनी या प्रसंगी रसिकांसमोर व्यक्त केले.


No comments:

Post a Comment