Friday, January 28, 2011

देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात

नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी
नेहमीची पारंपारिकता झुगारून देविशा फिल्मसने आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणाच इतक्या झोकदार प्रमाणे ऐटित केली की......मराठी चित्रपट सृष्टीत एक निराळा तरीही मराठीची पताका उंचविणारा चित्रपट येणार याची खात्रीच देऊळच्या निमित्ताने झासी.


वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ताने धाडसाने विषयाशी भिडलो असे ते सांगत नाना-दिलिप यांच्या अभिनयातून दोन अभिनय संपन्न नट ज्यांना आपण लहानपणी पाहिले त्यांच्याकडून ही गोष्ट चित्रपटातून साकार होताना पाहणे हा आनंदही पटकथा-संवाद लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीतव्यक्त केला ...त्यांच्या मनोगतातून देऊळ मधून एका समुहाची, गावाची, आजच्या काळची गोष्ट आशय गंभीर तरीही...तो विनोदी पध्दतीने चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पषट झाले.
पुण्याच्या हॉटेल प्राईडमध्ये निर्माते अभिजित घोलप यांच्या या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारीला झाली. तीही वेगळ्या थाटात, दिमाखात आणि संगीताच्या निनादात.. टाळ्य़ाच्या गजरात...ते ही उर्स्फूतपणे...
फेब्रुवारीच्या चार पासून वाईजवळच्या खेड्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होत आहे. तिथे साकारणारा हा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या नजरेतून उमटत जाणार आहे.
दिलिप प्रभावळकरांच्या भाषेत सांगाचये झाले तर उमेश कुलकर्णी हा सिनेमाच्या भाषेत काम करणारा दिग्दर्शक....
नानाचा आपण फॅन असल्याची कबुली देत त्याच्या अभिनयातून त्याचा आवाका थक्क करणारा आहे... त्याच्याबरोबर काम करणे हा योग या मिमित्ताने जुळून येतोय याचा आनंदही दिलिप प्रभावळकरांनी आपल्या सत्काराच्या भाषणात व्यक्त केला.
त्यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला म्हणून नाना पाटेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार इथे करण्यात आला...या वेळी दिलिप प्रभावळकरांनी पुरस्कार मिळाल्य़ाचा आनंद नक्कीच आहे.. अजून अनेकांचा पुरस्कार होणे गरजेचे आहे... हे ही स्पष्ट केले. लगे रहो मुन्नाभाई मधील गांधींच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तेव्हा जसा आनंद झाला तसा आज होत असल्याचेही ते म्हणाले.
नाना पाटेकरांच्या शब्दातच सांगाचये म्हणजे त्याची ( दिलीप प्रभावळकरांची) पात्रता जेवढी आहे तेवढे त्याला नाव मिळाले नाही असे वाटते....दिलिपची हसवा फसवी मधली भूमिका मी कित्येक वेळा पाहिली आहे.. खरचं इतका छान....
पण त्यांने स्वतःला मराठी पुरते मर्यादित ठेवलेय....आम्हाला तो हिंदीत मिळाला नाही...
मला खूप दिवसांनी मराठीत सिनेमा करायला मिळतोय..याचा आनंद आहे...हा चित्रपट चालेल... तो तुम्हाला हसता हसता विदारक सत्य सांगेल...चित्रपट चांगला होईल याची खात्री आहे.. मला उत्तम भूमिका दिली आहे.. मी ती छान करेन असा विश्वास द्यायलाही नाना पाटेकर विसरले नाहीत. इतरवेळी ज्यांच्याशी बोलायला घाबरतो तो नाना पाटेकरांचा आविर्भाव इथे नव्हता..ते खुशीत आणि आपल्या माणसात मनसोक्त विहरत होते...

गेले दहा महिने चित्रपटाचा अभ्यास आपण करत आहोत.. आज रिजनल सिनेमाला जे चॅलेंज दिसते ते पाहून ते स्विकारून चित्रपट यशस्वी करण्यासाठी राईट टिम निवडल्याची खात्री तंत्रज्ञानाच्या क्षेत्राक़डून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राक़डे वळणा-या अभिजित घोलप या मराठी निर्मात्याने नेमक्या वेळी सांगून जिद्दीचा प्रत्यय दिला. या चित्रपटाद्वारे मार्कटिंग आणि चित्रपटाचे ब्रॅंडिंग उत्तम करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. आपली संस्था उत्तमोत्तम विषयावरचे चित्रपट बनवून मराठी प्रेक्षकाला आनंदी बनविण्याचा प्रयत्न करेल असा आशावाद दिला.
देऊळच्या निमित्ताने ग्रामीण पार्श्वभूमि लाभलेली मराठीतील एक ब्लॅक कॉमेडी पाहायला मिळेल याची खात्री वाटते.. वळू आणि विहिर नंतर उमेश कुलकर्णी यांच्या कडून नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकरांमधला अभिनेता ताकदीने पडद्यावर दिसेल. या दोघांचा एकत्रीतपणे साकारलेला शोवटचा प्रसंग वनटेक मध्ये तर चित्रित होईलच..पण तो क्लायमॅक्स आत्तापर्यतच्या मराठी चित्रपटात मैलाचा दगड म्हणून साकारेल असा विश्वास उमेश कुलकर्णी यांना आहे....


मराठी चित्रपटाच्या भविष्याकडे पाहताना देऊळच्या कलावंतांनी रचलेली वीट न वीट प्रेक्षकांना सजवून अनुभवता येईल.
श्रेयनामावली

देऊळ
निर्माता- अभिजित घोलप
दिग्दर्शक- उमेश कुलकर्णी
पटकथा,संवाद- गिरीश कुलकर्णी
गीतकार- स्वानंद किरकिरे
संगीतकार- मंगेश धाकडे
प्रमूख भूमिका-
नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, डॉ.मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, अतिशा नाईक, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ज्यांती सुभाष, मंजूषा गोडसे, हृषिकेश जोशी इत्यादी.....

सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob. 9552596276

Monday, January 24, 2011

Vice President Condoles the of Death Pandit Bhimsen Joshi

The Vice President of India Shri M. Hamid Ansari has deeply condoled the sad demise of Pandit Bhimsen Joshi, Bharat Ratna awardee and one of the titans of Hindustani music of our times. In his condolence message, he has said that Pandit Bhimsen Joshi was unique in preserving tradition while incorporating new ideas in his music. He has thus become a living tradition in Hindustani music with tremendous influence on classical musicians, music lovers and the general public

Following is the text of the Vice President’s condolence message :

“I am deeply grieved to learn about the sad demise of Pandit Bhimsen Joshi, Bharat Ratna awardee and one of the titans of Hindustani music of our times.

Pandit Bhimsen Joshi was unique in preserving tradition while incorporating new ideas in his music. He has thus become a living tradition in Hindustani music with tremendous influence on classical musicians, music lovers and the general public. His rendering of devotional and patriotic songs are etched in public memory. By his personal example, he has demonstrated that a thirst for knowledge and music can propel individuals with limited means to seek such learning against all odds. His loss has created a huge void in the world of music. His services and contribution to music shall always be remembered.

My wife joins me in sending our heartfelt condolences to the members of the bereaved family and the wide circle of his admirers and friends and pray the Almighty to give them strength to withstand this loss.”

PM Condoles the Passing Away of Pt. Bhimsen Joshi

Prime Minister Dr. Manmohan Singh has condoled the sad demise of Pt. Bhimsen Joshi. In his message, Dr. Manmohan Singh said that the nation and the music world has lost a towering musical genius and the most famous and accomplished exponent of the Kirana gharana.

Following is the text of Prime Minister’s Message:

“I was deeply grieved to learn of the sad demise of Pandit Bhimsen Joshi. I join music lovers across the world in mourning the demise of this iconic vocalist. In his passing away, the nation and the music world has lost a towering musical genius and the most famous and accomplished exponent of the Kirana gharana.

For many decades, Pandit Joshi led the renaissance of Hindustani classical music with his unique style and mastery over ragas. He showed that music knows no linguistic or cultural barriers. He enriched the Kirana gharana through his distinctive individual style and adaptation of characteristics from other gharanas to create a unique vocal idiom. Generations of listeners were enthralled by his mellifluous voice, mastery of rhythm and magnificent renderings of bhajans and khayals. His rendering of the song "Mile Sur Mera Tumhara" on the theme of national integration is etched in the popular consciousness. To honour his exceptional musical talents and his success in reviving a sacred classical tradition among the people, the country bestowed its highest national honour, the Bharat Ratna on him in 2008.

I convey my heartfelt condolences to you and all the members of Pandit Bhimsen Joshi’s family, his disciples and admirers around the world”.

Kumari Selja Condoles the Death of Pt. Bhimsen Joshi

The Union Culture Minister Kumari Selja has condoled the death of legendary classical singer Pt. Bhimsen Joshi. In her condolence message here today, she said, Pt. Bhimsen Joshi was the leading exponent of the "khayal" form of singing and his renditions of devotional songs - bhajans and abhangs, mesmerised several generations of classical music lovers in India as well as abroad. She said that Pt. Joshi has enthralled a large number of audiences of all age and social strata through decades through live concerts, albums and films songs.

She said, for his dedication and devotion to Hindustani Classical Music and his role in its promotion, Pt. Joshi had been conferred the Sangeet Natak Akademi Award in 1976 and the highest civilian award Bharat Ratna in 2008.

President of India Condoles Passing Away of Pandit Bhimsen Joshi

The President of India, Smt. Pratibha Devisingh Patil has condoled the passing away of Pandit Bhimsen Joshi.

In her condolence message, she has said “Pandit Bhimsen Joshi was one of the most acclaimed exponents of Khayal Gayki of the Kirana Gharana and a doyen of Hindustani classical music. In his passing away the nation has lost one of the greatest and most popular classical vocalists.”

मोठ्या मनाचे स्वरभास्कर


बाजीराव रोड पुणे शाखेत असताना एक दिवस संगीतप्रेमी विजय दीक्षित यांचा फोन आला.

भीमसेन जोशींना वीस हजार रुपयाचं कर्ज बँकेकडून हवं आहे. अट एकच आहे. आत्ता त्वरित हवंय.

देतो. बँकेत या. तुम्ही या कर्जाला जामीनदार राहा.

ठीक आहे. अध्र्या तासात पोहोचतो.

अर्जदार नामवंत होते. त्यांना कर्ज देणं हे त्यांना सेवा देण्याची बँकेला मिळालेली संधीच होती. अशा वेळी मन दोन प्रकारे विचार करीत होतं.
एक म्हणजे कर्जाविषयी फारसं बोलणं हे या महान व्यक्तिमत्त्वाच्याबाबतीत बरं दिसणार नाही. तेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना कर्जाचे कारण, परतफेड कालावधी असले काहीही विचारायचे नाही. कर्ज हा विषयच काढायचा नाही. सन्मानाने पौसे सुपूर्त करायचे.
दुसरं व्यवहारी मन सांगत होतं. अर्जामध्ये कर्जाचे कारण काय लिहिणार?
मग वौयक्तिक कारण लिहायचं ठरवलं. कागदपत्रात फक्त प्रॉमिसरी नोट घ्यायची व कोणतेही तारण घ्यायचे नाही असा निर्णय घेतला. माझ्या मंजुरी अधिकारात एकाच्या सहीनं हे कर्ज देता येत नव्हतं. त्यासाठी दीक्षित यांना जामीनदार म्हणून घेतलं. सर्व कागदपत्रे तयार ठेवली. कॅशिअरना रु. 20,000च्या कोर्या नोटा घेऊन माझ्या केबिनमध्ये बोलवलं. एक गुलाब मागवून घेतला. स्वरभास्कर शाखेत येणार यामुळे आम्हा कर्मचार्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.

स्वरभास्कर भीमसेन जोशी केबिनमध्ये आले. मी उभं राहून त्यांना अभिवादन केलं. त्यांना बसण्याची विनंती केली. ते बसताच मी व कॅशिअरने मिळून रु.20,000च्या कोर्या नोटा असलेले बंद पाकीट व गुलाब त्यांना दिले. त्यांनी ते स्वीकारले. मी चहा मागविला होताच. तो येईपय|त अगदी मोजक्या अशा कागदपत्रांवर सह्या घेऊन टाकल्या. बँकेच्या आठवणी, सवाई गंधर्व महोत्सव अशा विषयांवर बोलणं झालं. कोठेही कर्जाबद्दल विषयही काढला नाही.
चहापानानंतर स्वरभास्कर गेले.
एका महान व्यक्तिमत्त्वाला सेवा दिल्याचा आनंद मला मिळाला. थोड्याच वेळात आमच्या हेड आॅफिसमधून फोन आला. बँकेचे जनरल मॅनेजर ही. बी. गांधीसाहेब बोलणार होते. काही काम करायचे राहिले की साधारणत: त्यांचा फोन यायचा. थोड्याशा विवंचनेतच फोन घेतला. आश्चर्य म्हणजे त्यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. माननीय भीमसेन जोशी यांनी गांधीसाहेबांना फोन करून बँकेत उत्कृष्ट सेवा मिळाल्याचं सांगितलं होतं.

भीमसेन जोशींकडून झालेलं कौतुक सदैव स्मरणात राहील.

वेळेपूर्वीच कर्जाची परतफेड झाली होती. बँकेने वौयक्तिक कर्ज देण्याचे अधिकार दिलेले असल्यामुळे अशी सेवा देता आली.
मी केवळ उत्सुकता म्हणून हे पैसे कशासाठी घेतले याची माहिती मिळविली.
भीमसेनजींना चांगल्या गाड्या वापरायला आवडत. ते स्वत: कौशल्यानं गाडी चालवत. ते विलंबित रागात गाणारे असले तरी गाडी मात्र द्रुतगतीनं चालवत. गाड्यांची देखभाल व्यवस्थित होते ना हे पाहण्यास स्वत: मोटर गॅरेजमध्ये जात. त्यामुळे गॅरेजमधील मेकॅनिक मंडळींमध्ये त्यांच्याबद्दल आदर होता. या मेकॅनिक लोकांना बक्षिसी म्हणून ती रक्कम त्यांनी दिली होती.

केवढ्या मोठ्या मनाचं हे व्यक्तिमत्त्व!

श्याम भुर्के, पुणे

(श्याम भुर्के यांच्या `आनंदाचे पासबुक` या मेहता पुब्लीशिंग हाउसने प्रकाशित कलेल्या पुस्तकातून साभार )

जीवनयात्रा 'स्वरभास्करा'ची


' स्वरभास्कर' भीमसेन गुरुराज जोशी यांचा जन्म चार फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकातील गदग येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांनी कन्नड-इंग्रजी डिक्शनरी तयार केली होती. आजही या डिक्शनरीचा वापर केला जातो. त्याचबरोबर त्यांनी 'नादपूत्र' नावाचे भीमसेनजींचे चरित्र लिहिले. वडिलांनी मुलाविषयी पुस्तक लिहिल्याचे हे एक आगळेवेगळे उदाहरण!

पंडितजींना लहानपणापासून संगीताविषयी आवड. संगीताच्या ध्यासाने प्रेरित झालेले पंडितजी वयाच्या ११ वषीर् घरातून पळून गेले. त्यानंतर संगीताचे धडे घेण्यासाठी त्यांनी बिजापूर, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली असा प्रवास करत ते पुन्हा गदगला आले. तेथे त्यांची भेट गुरू सवाई गंधर्व यांच्याशी झाली.

गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे पंडितजी हे सवाई गंधर्व यांच्या घरी राहात होते. पहिले १८ महिने सवाई गंधर्व त्यांच्याशी काहीही बोलले नाहीत. त्यातून त्यांना पंडितजींची चिकाटी आणि सचोटी पाहायची होती. त्यानंतर त्यांना तोडी, मुल्तानी आणि पुरिया राग शिकवण्यात आले. सलग चार वषेर् म्हणजे १९४० पर्यंत त्यांनी या रागांचे शिक्षण घेतले.

पंडितजींची भेट बेगम अख्तर यांच्याशी झाली. त्यांच्यामुळे त्यांना लखनौ रेडिओ स्टेशनवर स्टाफ आटिर्स्ट म्हणून नोकरी मिळाली. या ठिकाणी त्यांची संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी ओळख झाली. दिवंगत सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्याशी तेथेच त्यांनी मैत्री झाली. त्यानंतर १९४३ मध्ये ते मुंबईला आले; पण त्यांची खरी ओळख त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या ६० व्या वाढदिवशी झालेल्या मैफिलीद्वारे झाली. त्यावेळी त्यांनी केवळ गुरुच नव्हे; तर उपस्थित रसिकांची मने जिंकली!

एचएमव्ही कंपनीबरोबर त्यांनी १९४४ मध्ये रेकॉडिंग आटिर्र्स्ट म्हणून कामाला सुरुवात केली. कंपनीने त्यांच्या दोन हिंदी आणि दोन कन्नड भाषेतील गायनाच्या कॅसेटही काढल्या. त्यांच्यावर काढण्यात आलेल्या तीन डॉक्युमेट्रींमुळे ते प्रकाशझोतात आले. डचमधील चित्रपट निर्माते एम. लुईस यांनी १९६५ मध्ये त्यांच्यावर डॉक्युमेंट्री काढली. त्यानंतर कॅनेडियन उद्योगपती जेम्स बेव्हरेज यांनी डॉक्युमेंट्री काढली. तसेच १९९३ मध्ये गुलजार यांनी त्यांच्यावर ४५ मिनिटांची डॉक्युमेंट्री तयार केली.

पंडितजींना आतापर्यंत विविध सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार मिळाला. १९८५ मध्ये 'पद्मभूषण' आणि १९९९ मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्यात आला. राज्य सरकारने २००२ मध्ये त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवले. याशिवाय १९७५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. मध्यप्रदेश सरकारने त्यांना १९९२ मध्ये 'तानसेन सन्मान पुरस्कार' दिला. २००५ मध्ये त्यांना 'कर्नाटक रत्न' पुरस्कार मिळाला.

पंडितजींनी अनेक नवीन रागांची निमिर्ती केली. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले. त्यांचे मित्र आणि दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी निमिर्ती असलेल्या 'गुळाचा गणपती' चित्रपटासाठी त्यांनी गायन केले. तसेच 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'पतिव्रता' 'राजा शिवछत्रपती', 'संध्या राग', 'भैरवी' आणि 'संत तुळशीदास' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

पंडितजींनी १९६० पर्यंत अनेक नाटकांना संगीत दिले. त्यानंतर १९७० च्या सुमारास त्यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांची भजने गाजली. दूरदर्शनने तयार केलेल्या 'मिले सूर मेरा तुम्हारा...' या गीताने ते देशात घराघरात जाऊन पोहोचले.

पंडितजींच्या कार्यकर्तृत्त्वातील महत्त्वाचे योगदान म्हणजे १९५३ पासून पुण्यात भरवण्यात येणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव! आर्य संगीत प्रसारक मंडळातफेर् आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव म्हणजे गायक आणि रसिकांच्या आनंदाचा परमोच्च बिंदू असतो. किराणा घराण्याचे पं. भीमसेन जोशी यांना सरकारने 'भारतरत्न' पुरस्कार देऊन ख्याल गायकीचाच सन्मान केला आहे.


सौजन्य महाराष्ट्र टाईम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3678746.cms

Monday, January 17, 2011

प्रचारमाध्यम ते व्यापारमाध्यम!


विचार करण्याचा लोकांचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे ‘दूरदर्शन’नं लक्षात ठेवण्याची गरज होती; तसंच सद्विवेक आणि तारतम्य याचं प्रक्षेपण उपग्रह करू शकत नाही, हे आता लोकांनी लक्षात घ्यावं.. उपग्रह चित्रवाणीच्या आगमनानंतर करमणूक, नीतिमत्ता याबद्दलच्या संकल्पना, सांस्कृतिक व्यवहार पालटत गेले. सांस्कृतिक परिवर्तनाचं स्वागत करायला हवं हे खरं; पण हे परिवर्तन कोणी घडवून आणायचं? आपण की कंपन्यांनी?

उपग्रहामार्फत प्रक्षेपण आणि शंभर चॅनल हाताळण्यासाठी रिमोट कंट्रोल उपलब्ध झाल्यापासून आपल्या घरातल्या टीव्हीला आज कॅलिडोस्कोपचं स्वरूप प्राप्त झालं आहे. टीव्हीला जगाची खिडकी वगरे म्हटलं जातं. पण या खिडकीतून सगळं जग काही दिसत नाही. टीव्हीवाले त्यांना अभिप्रेत असलेलं जे काही दाखवतात त्यालाच आपण जग म्हणायचं. त्यांनी कोणतं जग बघायचं हे देखील ते स्व:त ठरवत नाहीत. ते टीआरपी ठरवतो.


उपग्रह प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वीचं टीव्हीजगत वेगळं होतं. टीव्हीवर काम करणाऱ्या आम्हा सर्व निर्मात्यांची चंगळ होती. आम्ही दाखवू ते कार्यक्रम पाहिले जायचे. निर्मात्यांपैकी फार थोडय़ांना टीव्ही या दृश्य माध्यमाची नस समजली होती. थोरामोठय़ांना टीव्हीवर बोलवायचं. स्टुडिओत तक्के-लोड मांडायचे आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या अशा स्वरूपाचे बहुतेक सारे कार्यक्रम टीव्ही कार्यक्रम म्हणून खपवले जात. आपला प्रेक्षकही दूरचित्रवाणी माध्यमाच्या ताकदीबद्दल, या आधुनिक माध्यमाच्या सामर्थ्यांबद्दल अनभिज्ञ होता. घरी बसून स्टुडिओत गाणारा कलाकार दिसतोय यानंच तो हरखून गेलेला. स्टुडिओत खुर्च्या टाकून केलेला प्रतिभा आणि प्रतिमा हा मुलाखतवजा कार्यक्रम तेव्हा मुंबई दूरदर्शनवरला सर्वात रसिकप्रिय समजला जायचा. घरातल्या घरात बसून पु.ल. बोलताना पाहायला मिळताहेत; गावस्करचे चौकार पाहायला मिळताहेत हे प्रेक्षकांच्या द्दष्टीनं अपूर्व होतं.


कार्यक्रमाच्या आखणीत कार्यक्रम दृश्यात्मकपणे कसा सादर केला जावा; यावर फार कमी बोललं जायचं. आपण कलाकारांना स्टुडिओत बोलवायचं; सादरीकरणाचं कॅमेरामन आणि इतर तंत्रज्ञ काय ते बघून घेतील असा निर्मितीचा खाक्या होता. तुलनेला आसमंतात दुसरा चॅनल नसल्यानं निर्मात्यांच्या अल्पसंतुष्टतेला उधाण आलं होतं. कार्यक्रमात शहर फारसं दिसायचंच नाही. कॅमेरे केंद्राबाहेर काढायचे ते मंत्र्यांचे दौरे चित्रित करण्यासाठी, कामगार विश्व कार्यक्रमात कामगार नाहीत; चाळी, गल्ल्या, गिरण्या या कामगारविश्वाचं दर्शन नाही. शेती-विषयक कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचं चित्रण नाही. शेतकरी हा माणूस आहे. त्याला पिकांच्या आरोग्याइतकी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. त्याला करमणूक हवी असते; शेतकऱ्यांत चित्रकार, गीतकार, गायक, नकलाकार असू शकतात. याचंही दर्शन शेतक-यांच्या कार्यक्रमातून घडायला हवं असं कोणाला वाटत नसे. युवकांच्या कार्यक्रमात युवक दिसले तर ते स्टुडिओत चर्चा करताना. कॉलेजच्या आवारात नाही. आमची पंचविशी नावाचा कार्यक्रम युवदर्शनमध्ये असायचा, त्यात पन्नाशी-साठीचे लोक भाग घ्यायचे आणि आपल्या कॉलेजातल्या दिवसाविषयी बोलायचे. सर्वात अधिक लोकप्रिय कार्यक्रम छायागीत होता, ज्यात दूरदर्शनचं योगदान शून्य होतं.


वृत्तपत्रांतून कार्यक्रमांच्या दर्जावर हल्ला होई. चित्रीकरणासाठी पुरेशा सोयी सुविधा नाहीत. कॅमेऱ्यांची संख्या पुरेशी नाही अशी ठरीव कारणं पत्रकारांसमोर फेकली जात. ही सबब पूर्णाशानं खरी नव्हती. जी काही साधनसामग्री होती ती पुरेशा कल्पकतेनं वापरली जातेय का हा खरा प्रश्न होता. बातम्यांचं चित्रण करण्यासाठी बाह्यचित्रणाचे कॅमेरे वापरले जात. हे कॅमेरे नेमके काय प्रकारच्या घटना चित्रित करत हे पाहाण्यासारखं असायचं. बडय़ा कंपन्यांच्या वार्षकि सर्वसाधारण सभा, राजभवनात आलेली शिष्टमंडळं वा राज्यपालांच्या हस्ते होणारे शुभारंभ अशा किरकोळ प्रसंगांचं चित्रण बातम्या म्हणून केलं जाई. पंतप्रधान, राष्ट्रपती समारंभानिमित्त शहरात आले की, ते परतेपर्यंतच्या सगळ्या हालचाली टिपण्यासाठी दूरदर्शनचे कॅमेरे त्यांच्या मागं धावत. मंत्रालयातल्या लहानसहान बैठका. मुख्यमंत्र्यांना भेटायला येणारी शिष्टमंडळं यासाठी एक-दोन कॅमेरे मंत्रालय परिसरात घुटमळत.


उपलब्ध तांत्रिक सामग्री सरकारच्या दावणीला बांधल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी काय शिल्लक राहणार? एखाद्या नाटकासाठी बाह्यचित्रण करता आलं तर निर्माता आपण खूप सर्जनशील काम केल्याच्या ऐटीत फिरे. गीतगायनाच्या कार्यक्रमात अधूनमधून निसर्गदृश्यं पेरणं हा सर्जनशीलतेचा कळस मानला जायचा.


नोकरशाहीची बैठक दूर ठेवून कार्यक्रमाच्या निवडीला आखणीला सांस्कृतिक प्रगल्भपणाची बैठक द्यायला हवी होती. माध्यमाच्या दृश्यप्रधान स्वभावाचा विचार कार्यक्रमाच्या सादरीकरणात असायला हवा होता. यातलं काहीच या नोकरशहांनी केलं नाही. माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या आज्ञेबरहुकूम त्यांना काम करावं लागे. निर्माते संचालकांच्या दडपणाखाली; तर संचालक केंद्रीय मंत्र्यांच्या दबावाखाली. दूरदर्शनवरले रटाळ कार्यक्रम केवळ पर्याय नसल्यानं वा सवयीचा भाग म्हणून पाहिले जायचे. आजही ही स्थिती कायम आहे.

आणीबाणीच्या दरम्यान एका पत्रकारानं मला विचारलं होतं, तुमच्या केंद्रावर संघाच्या माणसांचा भरणा अधिक आहे हे खरं आहे काय? ही मंडळी सरकारी कामात हस्तक्षेप करून त्यांची धोरणं राबवतात का? मी म्हटलं, तुम्ही म्हणता तसा संघातल्या माणसांचा इथं भरणा आहे हे खरं आहे. पण इथं काम करताना ते सत्तारूढ पक्षाशी एकनिष्ठ राहून आपलं काम चोख बजावतात असं माझं निरीक्षण आहे.
तत्कालीन सरकारनं घाईघाईनं देशभर दूरदर्शन केंद्रं सुरू केली, ती टीव्हीसारखं परिणामकारक माध्यम आपल्या हाती राहावं म्हणून. या धोरणामुळे दूरदर्शनचा केवळ आडवा विस्तार होत गेला. ही केंद्रं नीटपणे चालावीत, त्यातून प्रेक्षणीय कार्यक्रमाची निर्मिती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज सरकारला भासली नाही. सत्तर टक्के स्टाफ कंत्राटी पद्धतीनं निर्माण केला गेला. कंत्राट-कराराचं नूतनीकरण करणं हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती असल्यानं त्या अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणं ओघानं आलंच. ही एक प्रकारे सांस्कृतिक क्षेत्रातली वेठबिगारी होती. यातून एक अकलात्मक वातावरण या सरकारी टीव्ही वाहिनीत निर्माण झालं. टीव्हीवरले निर्माते, कॅमेरामन आणि इतर कलाकार पाहता पाहता व्हिडिओ कामगार बनून गेले. दूरदर्शनचं सांस्कृतिक स्थान आणि सामाजिक भूमिका लक्षात घेता तिथली कार्यपद्धती इतर सरकारी सेवा संस्थांहून भिन्न असायला हवी हे इथल्या प्रशासकांनी कधीच लक्षात घेतलं नाही. या प्रसारमाध्यमाचं प्रचारमाध्यमात रूपांतर करण्यासाठी जे जे करता येईल ते केलं.

आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचा गैरवापर झाला, हे खरं नाही. हा गरवापर दूरदर्शनच्या जन्मापासून सुरू झाला होता. आणीबाणीच्या काळात या वृत्तीचा अतिरेक झाला असं फार तर म्हणता येईल.
सरकारनं कितीही कायदे केले, बंदी घातली तरी लोकांच्या एका हक्काला कोणतंही सरकार धक्का लावू शकत नाही. तो म्हणजे विचार करण्याचा हक्क. दूरदर्शनवरल्या अधिकाऱ्यांना विचार-स्वातंत्र्य कधीच महत्त्वाचं वाटलं नाही. त्यांच्या कार्यक्रमांतून विचारस्वातंत्र्याच्या आविष्काराची धडपड कधी दिसली नाही.

उपग्रहामार्फत टीव्ही सिग्नल प्रक्षेपित करता येऊ लागले, आणि दूरदर्शनची ही शोकांतिका अधिक गडद झाली. कार्यक्रमाचा दर्जा वाढवण्यासाठी धोरणात लवचिकता आणणं गरजेचं होतं. पण हे घडलं नाही.
नियमाचा बागूलबुवा दाखवून गुणी कलावंतांना जाहीर प्रक्षेपणाची दारं बंद करणं; कमी प्रतीच्या कलावंतांना शासकीय अधिका-यांच्या, वरिष्ठांच्या दडपणापोटी किंवा व्यक्तिगत हितसंबंधासाठी पडद्यावर चमकायची संधी देणं या सा-याचे परिणाम कार्यक्रमाच्या दर्जावर होणार नाहीत असं कसं होईल?


उपग्रह प्रक्षेपणाआधी दूरदर्शन या सरकारी वाहिनीचं चित्र हे असं होतं. उपग्रह प्रक्षेपण, केबल टीव्ही या पाठोपाठ खाजगी कंपन्यांच्या वाहिन्या यांचं आगमन झालं. शहरी घराघरांत खासगी वाहिन्या पोहोचल्या. मक्तेदारीला आव्हान मिळाल्यामुळे दूरदर्शनला थोडी जाग आली. अधिक प्रायोजक मिळतील असे कार्यक्रम करा असे अलिखित आदेश निर्माते आणि अधिकाऱ्यांना मिळाले. मग खासगी टीव्हीवरल्या कार्यक्रमांच्या नकला सुरू झाल्या. त्यातही चांगल्या कार्यक्रमाऐवजी बुगीबुगीसारखे सवंग कार्यक्रम उचलले गेले. दम दमा दम यासारखे इथल्या कलासंस्कृतीशी विसंगत असे कार्यक्रम दूरदर्शनवर होऊ लागले. दर्जाकडे दुर्लक्ष करून नेपथ्याचा लखलखाट, झगमगीतपणाचं अनुकरण होऊ लागलं. नऊवारीतली स्त्री अचानक जीन्स घालून हिंडू लागावी तसं झालं.

केबल टीव्ही इथल्या आम जनतेला, खास करून खेडय़ातील गरीब जनतेला परवडण्यासारखी गोष्ट नव्हती; आजही नाही. त्यामुळे दूरदर्शन पाहाणाऱ्यांची संख्या आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेनं जास्त आहे. या वास्तवाच्या जोरावर दूरदर्शनवाले अजूनही आपला चॅनल सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा निष्कर्ष काढतात. पण हे स्वत:ला फसवणं आहे. सेन्सेक्सचे आकडे दाखवून देशातल्या गरिबीचं उच्चाटन झाल्याचा निष्कर्ष काढण्यासारखं आहे हे! नऊ कोटीच्या महाराष्ट्रात कार्यक्रमाची प्रशंसा करणारी वीस पत्रं आली की दूरदर्शनचा निर्माता हवेत तरंगायला लागतो. अशा वेळी हसावं की रडावं?
सांस्कृतिक क्षेत्राचं प्रशासन करण्यासाठी कला आणि साहित्याची आस्था आणि जाण असलेला संचालक लागतो. उपग्रहपूर्व काळात दूरदर्शन केंद्राला सुरुवातीला असे संचालक लाभले. उत्तमोत्तम कलाकारांनी या काळात दूरदर्शनवर हजेरी लावून आपली कला सादर केली. त्यांची जागा नंतर नोकरशहांनी घेतली आणि दूरदर्शनच्या आधीच्या पुण्याईवर पाणी फिरवले. उपग्रहापूर्वीच्या दूरदर्शनचं काहीसं काळंसावळं चित्र मी आपल्यापुढं मांडतो आहे याची मला कल्पना आहे.


दूरदर्शनवर चांगल्या निर्मिती झाल्या नाहीत; कलाक्षेत्रातलं दूरदर्शनचं योगदान शून्य आहे असा निष्कर्ष मात्र कृपया यातून कोणी काढू नये. राजकीय क्षेत्रात अपवादात्मक नेते आढळतात तसे सरकारी संस्थातही असतात. अनेक चांगले माहितीपट, चांगली नाटकं, चांगले गीत-गायनाचे, मुलाखतींचे कार्यक्रम दूरदर्शनवर झाले. पुढे काही खासगी वाहिन्यांनी या कलाक्षेत्रात सवंग, असांस्कृतिक िधगाणा घातला. तो पाहता दूरदर्शनची ही साधीशी कामगिरी आज खूप महत्त्वाची वाटू लागली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, अपुऱ्या साधनसामग्रीचा कल्पक वापर करून उत्तम कार्यक्रम निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखवणारे काही निर्माते दूरदर्शनला सुरुवातीच्या काळात लाभले. त्यातल्या काही प्रयत्नांची झलक आज ‘पाऊलखुणा’ कार्यक्रमात पाहायला मिळते.


दूरदर्शनवरल्या आजच्या निर्मात्यांबद्दल, त्यांच्या निर्मितीबद्दल काय बोलावं? इतर वाहिन्यांवरले अवगुण तेवढे उचलायचे असं दूरदर्शननं ठरवलं आहे. व्यापारीकरणामुळे कल्पकता कोप-यात सारली गेली आहे. ज्या कार्यक्रमाला जास्त जाहिराती तो चांगला अशी नवी व्याख्या निर्माण झाल्यावर दुसरे काय होणार?


करमणुकीद्वारे शिक्षण असं उदात्त प्रयोजन बाळगून या देशात दूरचित्रवाणीचं प्रसारण सुरू झालं. आता करमणुकीद्वारे करमणूक असं चालू आहे. यातही गर काही नाही. पण करमणुकीचा बुद्धी आणि तारतम्याशी संबंध असतो याचं भान ना दूरदर्शनपाशी ना खासगी वाहिन्यांपाशी. उपग्रहामार्फत टीव्ही प्रक्षेपण देशभर पसरू लागलं आणि शहरातल्या टीव्हीचंच नव्हे तर संपूर्ण लोकजीवनाचं चित्र बदलून गेलं. हे एक सांस्कृतिक जागतिकीकरणच होतं. करमणूक, नीतिमत्ता याबद्दलच्या संकल्पना, कुटुंब व्यवस्थेतल्या रीतीभाती, माणसा माणसातले सांस्कृतिक व्यवहार सगळ्या गोष्टीत उलथापालथ घडून यायला सुरुवात झाली. उपग्रह कार्यक्रमांचं प्रक्षेपण करू शकतो. सद्विवेक आणि तारतम्य याचं प्रक्षेपण नाही करू शकत. आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरायचं हे आता इथल्या मिडिया-मॅनेजरना ठरवावं लागेल.

सांस्कृतिक परिवर्तनाचं स्वागत करायला हवं हे खरं आहे. पण हे परिवर्तन कोणी घडवून आणायचं? वॉिशग मशिन, मोटारींचे टायर्स, मोबाइल फोन, डिर्टजट साबण तयार करणाऱ्या कंपन्यांनी की आपण? आपणा प्रेक्षकांमधलेच काही पलीकडे जाऊन बसतात. कार्यक्रम निर्माते बनतात, हे वास्तव लक्षात घेतलं तर? तर काय .. जनतेला आपल्या लायकीचं सरकार मिळतं तसा आपल्या लायकीचा टीव्ही मिळतो असं म्हणायचं का?

अवधूत परळकर

http://www.prahaar.in/collag/index.1.html

Saturday, January 15, 2011

जेडी ची वाडी: नाट्य प्रभाकराचा अस्त .

जेडी ची वाडी: नाट्य प्रभाकराचा अस्त .: ".मित्रांनो इतके दिवस खूप हलके फुलके लिहले समीक्षा लिहल्या .. काल रात्री विचारात पडलो होतो कि उद्याचे पोस्टिंग काय असावे  तोच चोवीस तास ..."

Thursday, January 13, 2011

मराठी रंगभूमीवरचा राजहंस हरपला !

मराठी रंगभूमीवर स्वतःचे युग निर्माण करणारे. एका नाट्यसंस्थेचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरणारे. कट्यार सारख्या संगीत नाटकाने मानदंड निर्माण करणारे.....आपल्या भूमिकेने राजहंसी रूप धारण करणारे....ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकरांचे निधन झाले...

आणि रंगभूमिवरचा राजहंसच हरपल्याची जाणीव झाली.


तो मी नव्हेच मधल्या पंचरंगी, बहुढंगी भुमिकांतून स्वतःचे नट म्हणून असलेले अस्तित्व हे तर पणशीकरांच्या अभिनयातला मोरपंखी तुराच जणू...

ते करताना ते भूमिका जगले.. व्यक्तिरेखेतल्या बारकाव्यांनी नाटकाला अजरामर केले,,, काळ बदलला...नटांमध्ये बदल झाले..तरीही पंतांचा तो लखोबा लोखंडेची किमयाच वेगळी.... खरेच ती सर कुणालाच आली नाही.नाट्यसंपदेचे संस्थापक म्हणून पंतांची कामगीरी अजोड नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल. त्यांनी निर्मिती केलेल्य़ा नाटकांची यादी देण्यापेक्षा जी आज माझ्या स्मृतीत साठवली गेली आहेत...त्यांचा उल्लेख करतो.

वसंत कानेटकरांचे अश्रुंची झाली फुले मधला प्रिन्सीपॉल विद्यानंद... इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब... तो मी नव्हेच तर आहेच...थॅंक यू मि. ग्लॉड मधला इन्स्पेक्टर.... बेईमान मधली सतीश दुभाषींबरोबरची गीरणी मालकाची भूमिका....मला काही सांगायचं...आणि जिथे गवकाला भाले फुटतात मधील अभीनयाचे टोक.....सारेच....पंतांच्या अभिनयातून साकरलेल्या भूमिकांनी मराठी रंगभूमीवर रसिकांना राजहंसी रुपाचे दर्शन घडले..सामीजिक आशय..त्यातून समाजातली दरी..इतिहासात डोकावता औरंगजेबालाही त्यांनी जिवंत केले...प्रिन्सीपॉल विद्यानंदाच्या रुपाने शैक्षणीक क्षेत्रातल्या प्रवृत्तींवर केलेली टिका...

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लखोहा लोखंडेच्या रूपांतून लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणींची कथा सांगणारे आचार्य अत्रेंयांचे तो मी नव्हेच ला दिलेले योगदान......सारेच पंतांच्या कर्तृत्वाची त्यांच्या अभिनय केलची उतुंग उंची घडवितात.

पुरुषोत्तम दारव्हेकर..पं. वसंतरांव देशपांडे...पं.जितेंद्र अभिषेकीं या त्रयींच्या रुपाने साकारलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक तथाकथित संगीत नाटकांचा चेहराच बदलून टाकणारे नाटक देउन संगीत रसिकांना वेगळ्या विश्वात घेउन गेले...याची निर्मितीही पंतांच्या शिरपेचातला मानाचा तुराच...

असा कलावंत...असा निर्मिता... फिरता रंगमंच प्रथम रंगमंचावर आणणारे...नाट्यरिषदेला स्वतःचे बळ देणारे सामाजिक भान आणि मराठी समस्कृतीवर प्रेंम करणारे कलावंत म्हणून ...

आणि अवघ्या काही प्रयोगाचून तो एक राजहंस हे कर्णीच्या जीवनावरचे नाटक धाजसाने निर्माण करणारे....ज्यात कर्णाच्या भूमिकेत शोभणारे रविंद्र महाजनी...

सारेच घडविले ते प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेने....

आज नाट्यसंपदा अवघा रंग एकची झाला...ने कार्यरत..आहेच

पण पंतांची मौलिक दृष्टी आता रहाणार नाही...

मराठी रंगभूमिवर राजहंसी रूपाने वावरणारा कलावंत...आज काळाच्या पडद्याआड गेला....
त्यांच्या आठवणीतून तो दिसणार...

त्यांच्या तो मीच... या आत्मचरित्रातून ते आता वाचता येतील...त्यांच्या भुमिकांची आठवण मनात साठवूल

या निर्माता, कलावंत आणि नाटकासाछी आयुष्य वेचणा-या या महान साधकाला....श्रध्दांजली.........सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

www.culturalpune.blogspot.com

www.subhashinamdar.blogspot.com

Mob. 9552596276

Monday, January 10, 2011

नवी कट्यार
रंगमंचावर एंट्री झाली आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी या नव्या रुपातल्या खॉंसाहेबांच्या प्रवेशाचे स्वागत केले. राजस्थानी हवेलीचे दर्शन देणारा जयपूरच्याफिकट तपकीरी रंगाचा भव्य सेट नांदी नंतर डोळ्यांना सुखावतो. आणि कट्यार नाटकाच्या जुन्या आठवणी दूर निघून जातात.
कै. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर करुन ठेवलेल्या नाटकाला तब्बल 28 वर्षानंतर साकारण्याचे
राहूल देशपांडे यांनी मनात आणले आणि ते सिध्दीस नेले. याचे कौतूक करावे तेवढेच थोडेच आहे. आजोबांचा वारसा नातवाने अशा पध्दतीने पुढे न्यावा ही खरी संस्कृतीची ओळख आहे.

साकारताना आजोबांच्या भूमिकेत राहूल बसले पण ती साकारली आपल्या स्वतःच्या गायकी ढंगाने.
अगदी टेचात.या निमित्ताने कट्यारच्या रुपाने गेले कांही वर्षे अस्तंगत पावत असलेल्या अभिजात संगीत नाटकाला नवसंजीवनी मिळाली असे म्हटले तरच ते वावगे ठरणार नाही.

वंसतराव देशपांडे संगीत सभा निर्मित वंतराव देशपांडे प्रतिष्ठान प्रकाशित संगीत कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळेच चार फेब्रुवारीची गुरुवार संध्याकाऴ संगीत रसिकांसाठी एक आनंददायी पर्वणीच होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हाऊसपुल्लची पाटी झळकत होती.
नाट्यसंपदेचे प्रभाकर पणशीकर ज्यांनी वसंतराव देशपांडें यांचे कट्यार आपल्या संस्थेमार्फत सादर केले ते ही प्रयोगाला हजर होते. विद्याताई अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर, रघुनंदन पणशीकर असे संगीत
आणि नाटक अनुभवलेले अनेक रसिक सारेच नाटक पाहण्यासाठी अधिर झाले होते. नाटकाला पारंपारिक संगीत नाटकापेक्षा वेगळी ट्रीटमेंट देताना दिग्दर्शक सुबोध भावे यांनी मूळ संहितेला धक्का न देता वंगळ्या पध्दतीने रंगमंचावर मांडले आहे. पं. भानुशंकराचे पात्र नाटकाच केवळ संवादातून प्रकटते.

कांही वेळा वेगळे संवादही अभिराम भडकमकरींनी दारव्हेकरांच्या संवादाला साजेसे लिहले आहेत. घराणेदार गायकीची परंपरा आणि त्यातल्या अनिष्ट वृत्तीवरही नाटकात अखेरीस टिका करुन संगीत साधकांना दिशा देण्यासाठी नवा संवाद शेवटी नाटकातून भरत वाक्य या न्यायाने दिले आहे.
तेही वेगळपण. हेच वेगऴेपण काय आणि नाटक कसे उभे केलेय हे पाहण्यसाठी कट्यारचा प्रयोग पहायला हवा. रसिकांच्या चेहर्‍यावर याबद्दची उत्सुकता दिसत होती.

पुरुषोत्तम दारव्हेकरांचे दर्जेदार लेखन आणि पं. जितेंद्र अभिषेकींनी संगीत दिग्दर्शनाच्या रुपाने चढविलेली रुपेरी झालर या दोन्हींचा मिलाफ या नव्या नाटकातून कसा होतो आहे ते पाहण्यासाठी
पुणेकर मोकळ्या मनाने आले होते.
एकेकाळी शंकर घाणेकरांना गाजविलेल्या कविराजाच्या भूमिकेत सुबोध भावे कसा शोभतो तेही पाहणे आकर्षणाचा भाग होता.

अखेरीस खॉंसाहेबांच्या रुपात राहूल देशपांडे यांची एंट्री झाली आणि..... उत्स्फूर्त टाऴ्यांनी प्रक्षागृह
निनादले गेले. कट्यार मधल्या संवादाची पकड आणि स्वरांचे मधाळ पण धारदार घुसळत जाणारे स्वर प्रेक्षागृहात घुमु लागले. तेव्हाच ही कट्यार रसिकांच्या काळपर्यंत थेट पोचल्याची पावती मिळाली.
घेई छंद मकरंदनंतर टाळ्यांनी दिलेली दाद अणि राहूलच्या रुपात नटलेल्या खॉंसाहेबांची उर्दू मिश्रीत भाषा सारेच ऐकण्यासाठी आतूर झालेले रसिक तृप्त होत गेले. तोच पण नवा पेहराव. वाक्यातली ती खास शैली. संयमीत पण संवादातले वेगळेपण टिपत रंगमंचावर फिरलेली व्यक्तिरेखा पाहताना मन मोहरुन जात होते. यातली नाट्यपदे तो इतरही वेळा गाजवत असे पण आज भूमिकेच्या आकृतीबंधात राहून इतरांना बरोबर घेऊन साकारली जाणारी व्यक्तिरेखा पाहण्यात नाविन्य होते. राहूल देशपांडे भूमिकेत दिसले छान आणि रंगलेही उत्तम. संगीत रंगमंचावर अशी ताकदीची तीही आजोबांनी गाजविलेली साकारण्याचे शिवधनुष्य त्यांनी सहजी पेलले. तो सूर त्यांनी नेमका पकडून ठेवला होता. नाटक चढत जाताना दारव्हेकरांच्या संवादातली ताकद पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने बाहेर येत होती.
राहूलच्या दमदार गायकीचा अनुभव घेतानाच महेश काळे यांनी सदाशिवाच्या रुपाने साकारलेली भुमिका ठसत गेली ती त्याच्या संथ पण तळपत्या गायन शैलीने. दुसर्‍या अंकात शेवटी सूतर पियाकी नाट्यपदातून दोन गायकींची सुरेल मैफल ऐकताना येणारा आनंद शब्दापलिकडचा होता.

कविराजाच्या भुमिकेत संयमी आणि मोकळ्या संवादाची किनार सुबोध भावेंच्या सहजी अभिनयातून उलगडत गेली. वाक्यांचा तोल संवादातला पोत सांभाळत ते वावरले. दिप्ती माटे( राहूलची बहिण) अणि सौरभ काडगावकर,अमेय वाघ यांनी नटविले चांद-उस्मान हवेलीतल्या सूरांना सांभाळत रसिकांना आपल्याबरोबर घेउन जातात. वेदश्री ओक (उमा)यांच्या लडीवाळ सुरेल पदांनी नाटकाची उंची गाठली .

दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे यांनी नाटकात जिवंतपणा आणला. नेपथ्य, प्रकाशातून साकारलेला
हे चार तासांचे हे नाटक कविराच्या रागमालिकेत गुरफटत नाही. स्वतःच्या रागांची मैफल मांडताना प्रकाशाच्या आणि हालचालीच्या सहाय्याने रागमालिका वेगळीच संगीत अनुभूती देते.

संगीताची तोच बाज आणि नाटकाची गती अणि संवादफेकीतली गंमत यातून कट्यारचा प्रयोग एक नवा आनंद देउन जातो यात शंका नाही.
महेश काळेया अमेरिकास्थित अभिषेकींच्या शिष्याने गायनात सादर केलेले कौशल्य पाहण्यासाठी ही नवी कट्यार आपल्या काळजात घुसवून घ्यायलाच हवी.

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar@gmail.com
www.culturalpune.blogspot.com
Mob: 09552596276

सांस्कृतिक संकेतस्थळ संपर्क


www.culturalpune.blogspot.com
सांस्कृतिक पुणे या मराठीत सुरू केलेल्या ब्लॉग साठी विविध ठिकाणी पुण्यात होणा-या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यावर स्वतंत्र भाष्य करू शकणारे तरूण ब्लॉगर्सनी संपर्क साधावा. हा एक नवा उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून सुरु केला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट आणि विविध ललीत कलांचे कार्यक्रम सादर करणा-या संस्थाचेही आगामी कार्यक्रम या ब्लॉगवर दिले जातील. इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही.
भारतातले पुणे हे एक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख स्थान मानले जाते. इथल्या रसिकांची कीर्ति सर्वदूर पसरली आहे. पुण्यात रोज अनेक कार्यक्रम होतात. त्यांच्यासाठी ही स्वतंत्र दखल घेणारी साईट असावी एवढीच माझी इच्छा आहे... त्यासाठीच हे सारे...
www.culturalpune.blogspot.com
हा ब्लॉग सुरु केला आहे..तो आपल्या सर्वांचे सांस्कृतिक संकेतस्थळ असेल.. ते करणे हा माझा प्रयत्न आहे. खात्री आहे आपण सारे याला मदत कराल. धन्यवाद.

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar@gmail.com
www.culturalpune.blogspot.com
Mob: 09552596276

Thursday, January 6, 2011

मटा संस्कृतीचा `स्मार्ट` उदय


शुकवार पासून पुण्याच्या वृत्तपत्रसृष्टीत नवी मटा संस्कृती उदयाला आली आहे. तिचे अस्तित्व काही पारंपारिक पायंड्यांना कदाचित धोका निर्माण ठरू शकेल. याचे उत्तर काळच देईल. पण एक नक्की अशा नव्या रूपाची.. नव क्षितीजांची गरज पुण्याच्या वाढत्या शहराला नक्कीच होती. ती गरज महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीने ओळखली आहे.

तिचे रूप आकर्षित आहे.. तिचा चेहरा सुंदर मेकअप केलेल्या पुणेरी मुलीने अधुनिकतेचे पण साजेलशे रुप घेणा-या नवरूणीसारखे मोहक आहे. तिच्या मजकुरात नव्या तरूणाईचे पडसाद आहेत. तिला ज्यागोष्टी हव्याश्या वाटतात याचे सादरीकरण आहे....
मात्र परंपरेला जपणे ती वाढविणे आणि वृध्दिंगत करणेही तेवढेच महत्वाचे आहे..याची जाणीव या नव्या पारंपारिक वृत्तपत्रांच्या कचेरीतून काम करून समृध्द झालेल्या पत्रकारांनी जाणले असेलच...

काळाचा बोजा...आता दिवसेंदिवस वाढणारा आहे...तो न पेलणारा आहे.. नवी माध्यमे आपलेही काही ठसे तरूणाईवर कोरणार आहे...तीही काळाची गरज आहे.
आकर्षक छपाईच्या तंत्रांनी अनेक ठिकाणी होणा-या छोट्या समारंभाची दखल इथे घेतली गेली पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्राचा परिपूर्ण विचार करता..

आज वाचकात तो सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्ग आधिक आहे...जो आपल्या काही नवेपणाचे क्षेय सर्वापर्यंत जावे वाटणारा... ज्याला कलांच्या नवदालनात अजून अडखळल्यासारखे वाटते. ज्याला स्थानिकातही जागा हवी असते.. ज्याचे लक्ष सदाशिवपेठी पुणेरी माणसारखे चाणाक्ष असते....
`शीला की जवानी` बरोबरच त्याला विविध ठिकाणी घडणारे चांगल्या उपक्रमाला प्रसिध्दी हवी असते. त्याला त्या पारंपारिकतेचा ..तिथल्या मक्तेदारीचा....थोड्या आगावूपणाचा तिटकारा आहे...त्या सर्वांना ही नवी मटासंस्कृति कशी सामावून घेणार आहे ?

पुण्यात नवा `आदर्श` देताना ह्या आमच्या `स्मार्ट मित्रा`ला तमाशातला नाचा म्हणून मिरवायचे नाही तर त्याचे खरे सांस्कृतिक बळ सिध्द करायचे आहे..

आमच्यासारखे असंख्य मित्र साथीला आहेतच..पण त्याला नवेपणाचा भपका आणताना परंपरेला धरून प्रसंगी त्याची संस्कृतिक मूल्ये वाढवायची आहेत.
खात्रीने तो ती पूर्ण करेल
आणि असंख्य वाचकांच्या घरात केवळ अकरा रूपयात चार महिने दिसणारा हा.. हा.. मित्र आपली खरी गरज भागवून तुमच्या घरचाच सखा बनेल.. तो बनावा हिच सदिच्छा.

आपला मटाप्रेमी,
सुभाष इनामदार, पुणे9552596276
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com

अभिवाचनातून वेदनेचा पुन:प्रत्यय


आदरणीय वीणाताई यांस,

मी केदार केसकर. पुण्याचा रहिवासी. पुण्यातील झेन्सार या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यामुळे मराठीची ओढ शांत बसू देत नाही. वेळ मिळेल तसा काहीतरी लिहित असतो, वाचत असतो, विचार करत असतो. गोनीदांच्या साहित्यातील 'शितू' मी सर्वप्रथम वाचली. त्यानंतर ४-५ दिवस मी भयंकर काढले. शितू डोक्यावरून खाली उतरण्यास तयारच होईना. एखाद्या मुलीशी कधी संवाद करण्याचा प्रसंग आल्यास वाटायचं, 'शितू'इतकी सोशिकता, सोज्वळपणा, सौंदर्य, समजूतदारपणा या मुलीत असेल काय? बराच काळ मनात खोलवर कुठेतरी काहीतरी अगम्य चालू होतं. आजकाल ही अशी निरागस व्यक्ती मिळणं अवघड आहे. त्यात आमची पिढी न संपणार्‍या स्पर्धेमुळे, आर्थिक ओढाताणीतून, न पेलणार्‍या जबाबदार्‍यांमुळे त्रस्त आहे आणि या खरं तर नको असलेल्या अतिव्यस्ततेमुळे आम्ही थकून गेलो आहोत. म्हणून न बोलता समजून घेणारं कोणीतरी असावं असं खूप वाटतं. शितू अजुनही मनाच्या कोपर्‍यात लपून बसलेली आहे ते त्यामुळेच.


गोनीदा, कुसुमाग्रज, विंदा, पुल, ना. सि.फडके, भा. रा. तांबे या सार्‍या मोठ्या लेखकांना, कादंबरीकारांना, कविंना भेटण्याची संधी न मिळणं ही आमच्या पिढीची मोठी शोकांतिका आहे आणि म्हणूनच हा अभिवाचनाचा कार्यक्रम पहाण्याची संधी मला लाभतेय हे मी माझं भाग्य समजतो. परवा "पडघवली" ऐकण्यासाठी मी आलो होतो पण जागा मिळाली नाही म्हणून काल जरा लवकरच आलो. कुणा एकाची भ्रमणगाथा ऐकली. तशी ही कादंबरी मी बरीच आधी वाचलेली आहे. ही कादंबरी लिहीली गेली त्यावेळेस मी फक्त उणे २५ वर्षांचा होतो. पण आज ह्या कादंबरीचं तुम्ही केलेलं छंदबद्ध अभिवाचन ऐकून मी त्यात पुन्हा कुठेतरी हरवून गेलो. त्यातील वेदनेच्या नितळ दर्शनाने हरखलो. हादरलो. पुरता हादरलो. या अनुषंगाने मनात घोळणारे विचार आपल्याला कळवावेसे वाटले. मी वयानी लहान आहे म्हणून माझ्या बालबुद्धीला न पेलणारे काही प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरेही बहूतेक त्या प्रश्नांमध्येच दडलेली असावीत. वेळ येईल तेव्हा ती मिळतील असं वाटतं.


"विपदस्सन्तु न: शश्वत्" या मागील कुंतीची भूमिका मला काल जाणवली. कळली असे मी म्हणणार नाही. वेदना... सार्‍या सुखाचा उगम बहूतेक या वेदनेपोटीच होत असावा. म्हणजे सुख हे सुद्धा वेदनेचे रूप? आणि आनंदाश्रू म्हणजे? का ती ही वेदना? म्हणूनचं का प्रसूतीच्या वेळेस होणार्‍या दु:खाला प्रसववेदना म्हणतात?


मला दहावीत एक कविता होती. कुणाची होती हे आता आठवत नाही.


दु:ख नको टीचभर हृदयाचे

दु:ख नको ओंजळभर प्रीतीचे

दु:ख असे द्या विशाल

निजकवेत येईल क्षितिजासह हे वर्तुळ...


दु:ख जेव्हा व्यापक, सर्वसमावेषक आणि उदात्त होतं त्यावेळेस वेदनेचा जन्म होतो का? खरतर वेदना हे दु:खाचं बाळ. पण कधीतरी एखाद्या समंजस पोरीने आपल्या आईबापाला समर्थपणे साथ द्यावी असं हे रूप. दु:खापेक्षा वेदना अधिक जवळची वाटते ती बहूतेक यामुळे.

पुन्हा वेदनेचा हुंकार वेदनेच्या प्रगल्भतेवर अवलंबून असतो. वेदनेची प्रगल्भता जितकी अधिक तितका हुंकार अधिक स्पष्ट आणि जितका हुंकार अधिक स्पष्ट तितकी त्यातून उमटणारी स्पंदने अधिक तीव्र. मग ती स्पंदने दुसर्‍याला जाणवतात पण तोपर्यंत परिस्थिती गंभीर होऊन बसते. यशोदेने शेवटी थांबविण्याचा प्रयत्न केला असता गोनिदांनी यशोदेला "नाही यशोदे, मी आता मागे फिरून तुला लहान करणार नाही" असं म्हटलं या वेळेस त्यांच्या वेदनेतील प्रगल्भतेचं दर्शन मला झालं. "दुरितांचे तिमिर जावो" हे मागणं माऊलींनी मागितलं ते या अलौकिक वेदनेच्या पोटीच का?


हे असे प्रश्न कालपासून माझ्या डोक्यात घोळत आहेत. तुमच्या अभिवाचनातून या नितांत सुंदर वेदनेचा पुन:प्रत्यय तुम्ही मला दिलात म्हणून मी तुमचा ऋणी आहे. जन्मच जर वेदनेपोटी होत असेल तर ही वेदना मनुष्यजन्माला कर्णाच्या कवच कुंडलांसारखी चिकटून रहाणार हे उघड आहे. पण त्या वेदनेचा हुंकार कान देऊन ऐकणारे जगात बोटांवर मोजण्याइतके आहेत. ज्यांना तो ऐकू येतो ते जाणतात की वेदना सरून गेली की संवेदना उरते आणि माणसाचा व्यास अजूनच मोठा होतो. आकाशावेरी गेलेली ही माणसं... यांना काय म्हणायचं?

दोन्ही हात जोडून मनापासून नमस्कार करायचा एवढच्!


तुमचा नम्र,
केदार केसकर

Wednesday, January 5, 2011

साथसंगत हवी आपल्या भारतीय वाद्यांची


गेल्या काही दिवसांपूर्वी तळेगावच्या श्रीरंग कलानिकेतन या संस्थेमार्फत शास्त्रीय गायन
आणि वाद्यवादनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले.
अशा प्रकारच्या गायन, वादन स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित केल्य़ा जातात.
पण या ठिकाणी वाद्यवादनाच्या स्पर्धेंमध्ये हार्मोनियम वादनाच्या स्पर्धाही झाल्या.
आजकाल ह्या वाद्यांच्या स्पर्धा फारच अभावाने होताना आढळतात.
त्यामुळे सर्वप्रथम श्रीरंग कलानिकेतने आभार.

सध्या कोणत्याही कार्यक्रमात साथीसाठी सिंथेसायझरचा वापर करतात.
अनेक वाद्ये या एकाच वाद्यावर वाजविली जातात ,हे या वाद्याचे निश्र्चितच वेगळेपण अहे.
परंतु आपल्या मूळ वाद्यांची आवाजाची जादू आहे ती त्यातून आपल्याला मिळत नाही.
हार्मोनियम मधून मिळणारा सच्चा सूर.
व्हायोलिनची मानवी कंठाजवळ जाऊन होणारी गायकाच्या सोबत केलेली साथ.
बासरीचा मधूर स्वर. सतारीचा झंकार ही मूळ वाद्यांची नजाकत आपण त्यातून अनुभवू शकत नाही.

स्वतंत्र वादन आणि साथ-संगत या दोन्ही गेष्टींसाठी हार्मोनियम आणि व्हायोलिन ही वाद्ये शिकून
आपल्या भारतीय परंपरेचा वारसा पुढे चालू रहावा असे वाटते.
यामुळे या स्पर्धेतील हार्मोनियम कलाकारांचे खूप कौतूक करावेसे वाटते.
सर्वांनिच अतिशय सुंदर वादन केले.
केवळ तिनच बक्षिसे द्यायची असल्यामुळे अमचाही नाईलाज होता .पण सर्वांनिच फारच तयारीने वादन केले.
याबद्दल कलावंतांचे आणि आयोजकांचेही अभिनंदन.


सौ. चारुशिला गोसावी, पुणे
मोबा – ९४२१०१९४९९
charusheelagosavi@gmail.com

गोनीदांचे शब्दशिल्प- नाबाद पाचशेती पडघवली..काल श्रोत्यांच्या मनात पुन्हा जागी झाली...त्यांनी त्यातली अंबा, म्हादू, व्यंकू आणि आक्काने आत्महत्या केलेला प्रसंग...सारेच पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचावर अवतरले ते डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव आणि रूचिर कुलकर्णी या तीन्ही कलाकारांकडून...तेही अभिवाचनाच्या रूपाने.
निमित्त ते या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे ५०० व्या प्रयोगाचे...सुदर्शनचे छोटेखानी रंगदालन फूलूनच नव्हे तर उभे राहणाही कठीण झालेले. आजपर्यत या अभिवाचनाला दाद देणा-यांचे आभार मानून पडघवलीतले..एकेक पात्र कादंबरीतून मंचावर अवतरत होते. गो.नी.दांडेकरांच्या लेखणीतून झिरपणारे ते शब्द संकलीत करून डॉ. वीणा देवांनी ते अभिवाचन एक तास चीळीस मिनीटांवर आणले. हा वेळ म्हणजे पडघवलीत मनस्वी हिंडण्याचा. व्यक्तिरेखेच्या एकेक प्रसंगानुरूप कधी बांधावर..तर कधी मामंजीच्या पडवीवर..तर कधी बंदरावर...
तीनही कलावंतींनी अभिवाचनाचा जो आदर्श पायंडा पाडून दिला आहे.. त्य़ातून शब्दातून कलाकृती किती समर्थपणे वाचकांसमोर उभी राहू शकते याचे ते उदाहरणच आहे. कादंबरीचा संक्षेप करूनही पडघवलीतील गुढरम्य वातावरण.. स्त्रीयांच्या स्वभातले कागोरे..ते कोकणातले विविध स्वभावांचे नमुने..त्याही पेक्षा..कोकण सोडून मुंबईकडे गेलेल्या माणसांनी या निसर्गाला कसे ठोकारले तेही साद्यंत स्षष्ट होते.
कधी लहान मुलगी..तर कधी सून..तीही मोठी आणि धाकटी..मामंजी..छोट्या रंग्या..म्हाहदू...नवरा..तर व्यंकू आणि त्यांचा कावेबाज डाव...सारेच उलगडत राहिले. निसर्गाने मानवाला दिलेले हे वरदान काळाच्या पडद्याआड जात आहे....

ते वाचवा... पाणी अमूल्य आहे..ते सांभाळा... गावातली सारी घरे म्हणजे एक कुटुंब ते विस्कटू देउ नका... माणसांच्या स्वभावातले दोष न घेता गुण घ्या ...एक ना दोन...अनेक निरीक्षणे गोनीदांच्या या पडघवलीच्या वाचनवातन बाहेर आली आहेत.
ती काढण्याचे सामर्थ्य ह्या निमित्ताने या आभीरूप वाचनातून बाहेर आले. ४ ते ६ जानेवारी २०१० ह्या तीन दिवशी पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा आणि जैत रे जैत अशा कादंबरीला त्रिपदीतील वाचनाचून साकारून हा एक शब्दयज्ञाचा जागर मांडला आहे. वडीलांच्या कलाकृतीचे जागरण तर यातून होईलच पण कांही समाजाला बोधही मिळेल.
महाराष्ट्रात, परप्रांतात अनेक व्याख्यानमालेत..कधी गडावर तर कधी गडाच्या पायथ्याशी ही अभिवाचनाची भ्रमणयात्रा झाली. शब्दाला साद घातली गेली.
यातून उभे राहिले ते दुर्गप्रमी. त्यांनी किल्ले पुन्हा जागृत केले. त्यातला इतिहास जिवंत केला. मावळ्यांप्रमाणे या किल्ल्यांवर हर हर महादेवचा गजर झाला. गोनीदांच्या स्मृती जागवल्या गेल्या.
अभिवाचनाने तृप्त झालेला रसिक त्यांच्या सीडीही घरी घेउन त्यांची पारायणे करत आहे. अशा नादमयी आणि संवादातून तर कधी निवेदनातून फुलणा-या या अभिवाचनाच्या सेतूला एकहजाराचीही पट्टी न लावता..ते लक्षावधी कार्यक्रमातून मराठी मुलाखाला साद घालत हजारो वर्ष होत राहोत..हिच सदिच्छा.


सुभाष इनामदार,पुणे
Subhashinamdar@gmail.com
Mob. 9552596276
www.subhashinamdar.blogspot.cpm
www.cluturalpune.blogspot.com