Monday, July 31, 2017

संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होऊन त्यातून कलाकृती बाहेर येते





कीर्ती शिलेदार यांचे अनुभवातून आलेले काव्यविषयक विचारदर्शन

मल्हार कवीता..या कार्यक्रमाची सुरवात रविवारी  पुण्यात साहित्या परिषदेच्या सभागृहात कीर्ती शिलेदार यांच्या सन्मानाने झाली.. रंगत संगतचे प्रमोद आडकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या जेष्ठ भगिनी दिप्ती किरण भोगलेही व्यासपीठावर होत्या..
तेव्हा रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या सन्मानाचा मान राखत त्यांनी संगीत नाटक आणि पदांचे महत्व..यातून काव्य आणि साहित्य यांच्या आदानप्रदानातूनच उत्तम संगीत नाटक वा साहित्य बाहेर येते ते आपल्या मनोगतातून बोलून दाखविले..

संगीत नटालाही नायकातील पदांचा अर्थ उमजून मग त्यावर अभिनय करायचा असतो..नाटकातील रचना ही गेयच असावी लागते..आणि त्यातून अभिनयही करता यावा लागतो..

खाडीलकराच्या रचना थोड्या अवघड पण अर्थाने समऋध् होत्या आजही नाच्यसंगीतात खाडीलकरांच्या पदांची निवड केली जाते..असे सारे कीर्ती शिलेदार आपल्या विचारात स्पष्ट करतात..

त्याचा हा सारांश..



मी संगीत नाटकात काम करताना लक्षात येते की संगीत नाटकात जेवढे महत्व गद्याला आहे तेवढेच महत्व पदालाही  आहे..संगीत नाटकातली रचना ही गेय असावी लागते.. शब्दांचा अभ्यास करणे ही संगीत नटाची पहिली जबाबदारी असते.

संगीत नाटकात किर्लेास्कर मंडळींपासून हिच शिस्त नटांना आहे की काव्याचा भावार्थ आधी समजून घ्या मग नंतर  त्यावर तुम्हाला अभिनय करता येईल. त्यामुळे पदांचा अर्थ कळाल्याशिवाय गायचे नाही हा दंडक नाना आईंनी किर्लोस्कर मंडळींपासून पाळला..तिच शिकवण आमच्या पिढीपर्य़त आली.

आम्ही कवींनी केलेल्या कवीतांपासून जरासे लांब असू पण नाटकामध्ये नाटककारांनी केलेल्या कवीतेशी आमचा खूप जवळचा संबंध आहे. आमच्याकडे राम गणेश गडकरींसारखे काव्यप्रभू होते.  देवल आहेत, किर्लास्कर आहेत, खाडीलकर आहेत. बाळ कोल्हटकरांसारखा कवी, लेखक मराठी रंगभूमीवर आले्ला आहे.  कवीवर्य रा. ना. पवार, चिं.त्र्य़ं. खानोलकर, गंगाधर महांबरे हे सारे आमच्याकडे राहिलेले आहेत..त्यामुळे शब्दांची साधना हे लाकं किती करतात. हे आम्ही तै अगदी जवळून अनुभवलेले आहे.

खानोलकरांचे अनुभव तर फारच  ग्रेट. निळकंठबुवा अभ्यंकर आणि खानोलकर यांच्या चर्चा व्हायच्या त्यातला क्षणन क्षण कानात साठवून ठेवला आहे. आमचे बुवा शब्द गेय हवा यावर ठाम असत.. खानोलकर एकही शब्द इकडचा तिकडे करायला तयार नसत. येतो येतो सजणा..सवतीचा वास तुझ्या वसना.. हि त्यांची शब्दरचना होती..बुवा म्हणाले वास म्हटल्यावर हे जरा विचित्र वाटते. हा शब्द बदला ना कवीराज.. बुवा म्हणाले. खानोलकर म्हणाले गंध चालेल..चालेल म्हटल्यावर ते पद झाले..येतो रे येतो सजणा..  सवतीचा गंध तुझ्या वसना..असे पद कायम झाले. नांदिच्या पदातला  कळा हा शब्द बदलालया मात्र खानोलकरांनी ठाम नकार दिला.. त्यांच्या मते.. कला सादर होत असताना नटाला आसंख्य कळा अनुभवाव्या लागतात तेव्हा तुमची कला पोहोचते. अशा चर्चेतून  आमचे जीवन समृध्द होऊन गेले..अभोगी नाटकाच्या तालमीमुळे.. अभोगी नाटकाने यश जरी दिले नसेल पण आमचे जीवन अगदी संपन्न केलेले आहे.
 संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होणे आणि त्यातून कलाकृती बाहेर येते हे फार महत्वाचे आहे.
 मीही एक लहानपणा कवीता करण्याचा प्रयत्न केला होता..बालवय आणि बालबुध्दी याच्यारलीकडजे त्याला काही अर्थ नव्हता. महांबरे कवीता लिहीतात मीही कवीता लिहिते..अशातून ती चूक घडली.


नवे संगीत नाटक करताना शब्द बदलण्याचे धाडस कधी केले..म्हणून मी किंचीत कवी असू शकेन.. शाळेत आमच्या कवीच्या जाणीवा समृध्द देल्या त्या  विमलाताई गरवारेतल्या वा. भा. जोशी सरांनी. बालकवी आणि केशवसूत यांच्यावर शाळेत त्यांनी एक कार्क्रम शाळेत केला होता. त्यात मी . लता सहभागी झालो. त्यामुळे केशवसुतांचे काव्य अतिशय प्रिय झाले. अजुनही त्या सुंदर कार्यक्रमाची आठवण माझ्या मनामध्ये  तशीच्या तशी कोरली गेलेली आहे.















मल्हार शब्द असेलेले नामदेवांचे काव्य त्यांनी शेवटी गाऊन दाखविले..





-सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, July 17, 2017

विणा सहस्त्रबुध्दे यांची स्मृती गुरूवंदनेतून जागविली







गुरूपौर्णीमेच्या निमित्ताने एस एन डी टी संगीत विभागाने विदुषी  वीणा सहस्त्रबुध्दे यांना समर्पित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या काही बंदिशी, त्यांनी विद्यापिठात संगीत विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षे ( 1985 ते 1990) त्या काळात दिलेल्या चालीतून तयार झालेली गीते..सादर झाली. प्रयोगशिल शिक्षिका..म्हणून काम करताना त्यांच्या स्वभावाची वैशिष्ठ्ये् आणि त्यांचे लक्षात राहिलेले साधेपण याची अनेक शिष्यांच्या मनातून तयार झालेली त्यांची प्रतिमा आणि त्यातून विणाताईं विषयी निर्माण झालेला जिव्हाळा रविवारी अठरा जुलैला  सकाळी झालेल्या गुरूवंदना या कार्यक्रमातून उपस्थित संगीतप्रेमी रसिकांना आणि विद्यापिठात संगीताचा अभ्यासक्रम करीत असलेल्या विद्यार्थीनीं ऐकता आला.. आणि आपल्या विद्यापिठाने काय गमावले आणि काय कमावले याचा उलगडा होत गेला..

 त्यांच्या काळात ज्यांनी त्यांच्याकडून संगीताचे ज्ञान घेतले असा काही माजी विद्य़ार्थीनीं तो सादर केला. यात शिरिष करंदीकर, विद्या निवळीकर,  अंजली आपटे, शैला वझे, डॉ. राजश्री महाजनी, खास दुबईहून आलेल्या आरती पाठक (स्वरसमूह संस्था आणि गांधर्व महाविद्यालयाची शाखा तिथे चालवितात ) आणि अंजली मालकर यांनी इथे त्यांनी चाल दिलेले श्र्लोक, काही सरस्वतीवंदना, समूह गीते..काही बंदिशी आणि  तराणे..तसेच अडाचौताल रागातली खास चीज..यातून रसिकांपर्य़त पोचली..
काही दुर्मिळ ध्वनीचित्रफितीतून वीणा ताईंचे गान गुरू म्हणून केलेले मोलाचे कार्य इथे पुन्हा पहाता आले.




 हा भावनामय आणि स्वरांतून गायलेल्या रचना  ऐकवून विणाताईंवरचा स्नेह पुन्हा पुढच्या पिढीपर्य़ंत पोहचविला. याची सगळी संवादाची जबाबदारी डॉ. पौर्णीमा धुमाळे यांनी मनोभावे सांभाळली.


भारती बराटे, सीड इन्फोटेकच्या संचालिका, एस एन डी टी च्या मराठी विभाग प्रमुख डॉ. रेखा इनामदार साने, संगीत विभागाच्या प्रमुख डॉ. शितल मोरे. डॉ. लता गोडसे. विणाताईंच्या काळात साथ करणारे मणेरिकर काका आणि मिराशी सर यांचाही सत्कार या कार्क्रमात केला गेला. त्यांनी महर्षी कर्वे यांची प्रतिमा असलेला पुतळा भेट देण्यात आला.

विणाताई कलाकार म्हणून संगीत जगताला परिचित आहेत..पण त्या तितक्याच उत्तम शिक्षीका होत्या हे कदाचित अनेकांना माहित नसेल..त्या कुशल शिक्षिका कशा होत्या याचा या कार्यक्रमातून प्रत्यय पहायला मिळाला.आजही ह्या संस्थेने त्यांची प्रेरणा घेऊनच काम करणे सुरू ठेवले आहे. पुण्यातल्या एस एन डी टी च्या संगीत विभागाची सुरवात या विणावंदना या कार्यक्रमाने झाली.. त्यांच्या प्रेरणेतून पुढच्या पिढीला मार्गदर्शन लाभेल अशी आशा कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. शितल मोरे यांनी व्यक्त केली.

डॉ. विणा सहस्त्रबुध्दे हे नाव कानपूरहून पुण्याल्या जेव्हात्या आल्या तेव्हा हे नाव  फारसे कुणाला माहित नव्हते. पुण्याला आल्यावर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली..काही दिवसातच हे नाव एखाद्या झंझावाता प्रमाणे जगातल्या संगीत क्षेत्राला परचित झाले..आणि त्यांची गणना शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज कलाकारांमध्ये होऊ लागली. भारतभर दौरे सुरू असतानाच 85 मध्ये एस एन डी टी संस्थेत संगीत विभागात अद्यापनासाठी दाखल झाल्या.
एक मोठ्या कलाकार म्हणून समाजात वावरत असताना त्या इथे पूर्णपणे एक शिक्षिका म्हणून कशा वागत असत याची आठवण आम्हाला झाली. 

वीणाताईंची कामावरची निष्ठा..कुठेही परगावी गेल्या तरी आपली अध्यापनाची शिस्त काही त्यांनी मोडली नाही..त्या एकदा आपल्या गादीवर विराजमान झाल्या की पुढे अखंड त्यांचे संगीतविषयक ध्यान अखंड सुरु असायचे. त्यांच्या बाहेरच्या उपरक्रमातही त्या आपल्या विद्यार्थीनींना सहभागी करून घेत असत. संस्कृतकाव्यावर त्यांचा विशेष भर होता..अनेक सुंदर काव्य त्या नेहमी गात असत. आज सुगम संगीत, चित्रपट संगीत गाणारे अनेक ग्रुप आहेत.पण त्यांच्या डोक्यात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम करणारा एक उत्तम ग्रुप नाही याची खंत त्यांना होती..


त्यांच्या डोक्यात या विद्यापिठाच्या आजी आणि माजी विद्यार्थीनींना एकत्र करून शास्त्रीय संगीताचा क्वायर ग्रुप करायची त्यांची कल्पना होती.. त्यातून उच्च दर्जाचे साहित्य आणि शास्त्रीय संगीत लाोकांपर्य़त पोचवायचे, त्याची आखणीही त्यांनी केली होती..ते प्रत्यत्रात जमू शकले नाही..पुढे त्यांनी विद्यापीठ सोडले आणि ते काम अपुरे राहिले..

भारती बराटे यांनी आपला वीणाताईंचा स्नेह कसा होता आणि आपण किती चांगले काम करीत आहात जाणीव करून दिली.

रेखा इनामदार सांने यांनी वीणाताईंच्या एस एन डी टीतल्या प्रवेशापासून  त्यांच्या सहवासात जगलेल्या आठवणी जागविल्या.. आज त्यांना असा कार्यक्रम पाहून धन्यता वाटत असेल असेही त्या म्हणाल्या..














 आज या निमित्ताने काही माजी विद्यार्थीनी एकत्र येऊन हा कार्यक्रम कतरताहेत..निमित्त वीणाताईंच्या पहिल्या स्मृतिचे असले तरी हा उद्देश समोर ठेऊन शास्त्रीय संगीताचा प्रसार करणारा हा कलावंत समूह एकत्र झाला..हे या कार्क्रमाचे मोठे यशच मानावे लागेल..


यातूनच वीणाताईंनी घालून दिलेल्या मार्गावर चालणारा हा एस एन डी टी चा ग्रुप यातून तयार झाला..यातून अधिक काही पुढे कार्य सुरु राहिल अशी आशा वाटते..




- सुभाष इनामदार, पुणे
9552596276