Wednesday, January 5, 2011

साथसंगत हवी आपल्या भारतीय वाद्यांची


गेल्या काही दिवसांपूर्वी तळेगावच्या श्रीरंग कलानिकेतन या संस्थेमार्फत शास्त्रीय गायन
आणि वाद्यवादनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले.
अशा प्रकारच्या गायन, वादन स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित केल्य़ा जातात.
पण या ठिकाणी वाद्यवादनाच्या स्पर्धेंमध्ये हार्मोनियम वादनाच्या स्पर्धाही झाल्या.
आजकाल ह्या वाद्यांच्या स्पर्धा फारच अभावाने होताना आढळतात.
त्यामुळे सर्वप्रथम श्रीरंग कलानिकेतने आभार.

सध्या कोणत्याही कार्यक्रमात साथीसाठी सिंथेसायझरचा वापर करतात.
अनेक वाद्ये या एकाच वाद्यावर वाजविली जातात ,हे या वाद्याचे निश्र्चितच वेगळेपण अहे.
परंतु आपल्या मूळ वाद्यांची आवाजाची जादू आहे ती त्यातून आपल्याला मिळत नाही.
हार्मोनियम मधून मिळणारा सच्चा सूर.
व्हायोलिनची मानवी कंठाजवळ जाऊन होणारी गायकाच्या सोबत केलेली साथ.
बासरीचा मधूर स्वर. सतारीचा झंकार ही मूळ वाद्यांची नजाकत आपण त्यातून अनुभवू शकत नाही.

स्वतंत्र वादन आणि साथ-संगत या दोन्ही गेष्टींसाठी हार्मोनियम आणि व्हायोलिन ही वाद्ये शिकून
आपल्या भारतीय परंपरेचा वारसा पुढे चालू रहावा असे वाटते.
यामुळे या स्पर्धेतील हार्मोनियम कलाकारांचे खूप कौतूक करावेसे वाटते.
सर्वांनिच अतिशय सुंदर वादन केले.
केवळ तिनच बक्षिसे द्यायची असल्यामुळे अमचाही नाईलाज होता .पण सर्वांनिच फारच तयारीने वादन केले.
याबद्दल कलावंतांचे आणि आयोजकांचेही अभिनंदन.


सौ. चारुशिला गोसावी, पुणे
मोबा – ९४२१०१९४९९
charusheelagosavi@gmail.com

No comments:

Post a Comment