Monday, January 24, 2011

जीवनयात्रा 'स्वरभास्करा'ची


' स्वरभास्कर' भीमसेन गुरुराज जोशी यांचा जन्म चार फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकातील गदग येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांनी कन्नड-इंग्रजी डिक्शनरी तयार केली होती. आजही या डिक्शनरीचा वापर केला जातो. त्याचबरोबर त्यांनी 'नादपूत्र' नावाचे भीमसेनजींचे चरित्र लिहिले. वडिलांनी मुलाविषयी पुस्तक लिहिल्याचे हे एक आगळेवेगळे उदाहरण!

पंडितजींना लहानपणापासून संगीताविषयी आवड. संगीताच्या ध्यासाने प्रेरित झालेले पंडितजी वयाच्या ११ वषीर् घरातून पळून गेले. त्यानंतर संगीताचे धडे घेण्यासाठी त्यांनी बिजापूर, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली असा प्रवास करत ते पुन्हा गदगला आले. तेथे त्यांची भेट गुरू सवाई गंधर्व यांच्याशी झाली.

गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे पंडितजी हे सवाई गंधर्व यांच्या घरी राहात होते. पहिले १८ महिने सवाई गंधर्व त्यांच्याशी काहीही बोलले नाहीत. त्यातून त्यांना पंडितजींची चिकाटी आणि सचोटी पाहायची होती. त्यानंतर त्यांना तोडी, मुल्तानी आणि पुरिया राग शिकवण्यात आले. सलग चार वषेर् म्हणजे १९४० पर्यंत त्यांनी या रागांचे शिक्षण घेतले.

पंडितजींची भेट बेगम अख्तर यांच्याशी झाली. त्यांच्यामुळे त्यांना लखनौ रेडिओ स्टेशनवर स्टाफ आटिर्स्ट म्हणून नोकरी मिळाली. या ठिकाणी त्यांची संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी ओळख झाली. दिवंगत सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्याशी तेथेच त्यांनी मैत्री झाली. त्यानंतर १९४३ मध्ये ते मुंबईला आले; पण त्यांची खरी ओळख त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या ६० व्या वाढदिवशी झालेल्या मैफिलीद्वारे झाली. त्यावेळी त्यांनी केवळ गुरुच नव्हे; तर उपस्थित रसिकांची मने जिंकली!

एचएमव्ही कंपनीबरोबर त्यांनी १९४४ मध्ये रेकॉडिंग आटिर्र्स्ट म्हणून कामाला सुरुवात केली. कंपनीने त्यांच्या दोन हिंदी आणि दोन कन्नड भाषेतील गायनाच्या कॅसेटही काढल्या. त्यांच्यावर काढण्यात आलेल्या तीन डॉक्युमेट्रींमुळे ते प्रकाशझोतात आले. डचमधील चित्रपट निर्माते एम. लुईस यांनी १९६५ मध्ये त्यांच्यावर डॉक्युमेंट्री काढली. त्यानंतर कॅनेडियन उद्योगपती जेम्स बेव्हरेज यांनी डॉक्युमेंट्री काढली. तसेच १९९३ मध्ये गुलजार यांनी त्यांच्यावर ४५ मिनिटांची डॉक्युमेंट्री तयार केली.

पंडितजींना आतापर्यंत विविध सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार मिळाला. १९८५ मध्ये 'पद्मभूषण' आणि १९९९ मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्यात आला. राज्य सरकारने २००२ मध्ये त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवले. याशिवाय १९७५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. मध्यप्रदेश सरकारने त्यांना १९९२ मध्ये 'तानसेन सन्मान पुरस्कार' दिला. २००५ मध्ये त्यांना 'कर्नाटक रत्न' पुरस्कार मिळाला.

पंडितजींनी अनेक नवीन रागांची निमिर्ती केली. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले. त्यांचे मित्र आणि दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी निमिर्ती असलेल्या 'गुळाचा गणपती' चित्रपटासाठी त्यांनी गायन केले. तसेच 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'पतिव्रता' 'राजा शिवछत्रपती', 'संध्या राग', 'भैरवी' आणि 'संत तुळशीदास' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

पंडितजींनी १९६० पर्यंत अनेक नाटकांना संगीत दिले. त्यानंतर १९७० च्या सुमारास त्यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांची भजने गाजली. दूरदर्शनने तयार केलेल्या 'मिले सूर मेरा तुम्हारा...' या गीताने ते देशात घराघरात जाऊन पोहोचले.

पंडितजींच्या कार्यकर्तृत्त्वातील महत्त्वाचे योगदान म्हणजे १९५३ पासून पुण्यात भरवण्यात येणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव! आर्य संगीत प्रसारक मंडळातफेर् आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव म्हणजे गायक आणि रसिकांच्या आनंदाचा परमोच्च बिंदू असतो. किराणा घराण्याचे पं. भीमसेन जोशी यांना सरकारने 'भारतरत्न' पुरस्कार देऊन ख्याल गायकीचाच सन्मान केला आहे.


सौजन्य महाराष्ट्र टाईम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3678746.cms

No comments:

Post a Comment