Tuesday, April 5, 2011

जरा याचाही विचार करा


भारतीय क्रिकेट मधील व्यक्तिपूजा अनेकांना क्रिकेट पासून दूर नेण्यास कारणीभूत ठरते आहे. नुकत्याच झालेल्या
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडूलकरच्या नगण्य १८ धावा होत्या अन इतरही बाबतीत तो काही
स्पृहणीय करू शकला नाही,पण माध्यमांनी जणू तेंडूलकरच्या मिडिया म्यानेजरची भूमिका घेऊन त्याला प्रसिद्धी देण्याचा
चंगच बांधला होता. सामना सम्पल्यावर कर्णधाराची विजयी मिरवणूक काढण्या ऐवजी तेंडुलकरची काढणे हेही निषेधार्ह होते.
का तर म्हणे तो एक दिवसीय सामन्यातून निवृत्त होणार म्हणून!

हे कौतुक सम्पल्यावर तो निवृत्ती नाकारणार हे गृहीतच होते.
कारण जाहिरातीच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत तो फक्त संघात असे पर्यंतच राहू शकतो,हे त्याला चांगलंच माहिती आहे.
या पूर्वीही अनेकदा वाईट खेळल्या नंतर खोट्या दुखण्याचं नाटक करून तेंडूलकरने आपण मुत्सद्दी, व्यवहारचतुर आणि राजकारणी
असल्याचे दाखवले आहे. रसिकांच्या वेड्या प्रेमामुळे आज सचिनने चांगले खेळण्याची गरजच उरली नाहीये.
त्याने फक्त टीम मधली एक जागा शक्य तितकी वर्षे अडवून ठेवावी अशी योजना त्याने आपल्या मध्यस्थांमार्फत करूनच ठेवलेली आहे.
आपण चर्चेत नाही हे लक्ष्यात येताच अत्यंत मुत्सद्दीपणाने मद्याची जाहिरात नाकारल्याची बातमी माध्यमांना देऊन त्याने स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले होते.
कोका कोलाची काही कोटीची जाहिरात करण्याचा अनुबंध मिळताच त्याची जाहिरात करायलाहि तो विसरला नाही.
क्रिकेट हा संघाचा खेळ आहे तो टेनिस प्रमाणे वैयक्तिक खेळ नाही. कारण असो नसो सतत फक्त एकाच खेळाडूची स्तुती होत राहिली तर संघ भावनेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्या त्या वेळी कर्तृत्व गाजवणा-या खेळाडूंचे कौतुक होणे अत्यंत आवश्यक आहे. ओढून ताणून सचिनचे गुण गान करण्याची वृत्ती मिडीयाने बदलण्याची गरज आहे. आणि त्याच्या शतकांपेक्षा देशाची हारजीत महत्वाची आहे,
हे भारतीय क्रिकेट रसिकांना कळणेहि महत्वाचे आहे. विश्वचषक धोनीच्या टीमने जिंकला आहे, सचिनच्या नव्हे!
फायनल मध्ये शेवटी चार धावा आवश्यक असताना षटकार फक्त धोनीच मारू शकतो, ते सचिनच्या आवाक्यात कधीच नव्हते आणि या पुढेही शक्य नाही.
सचिन क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याच्या आज पर्यंतच्या एकत्रित धावा मोजायच्या, आणि इतरांच्या मात्र फक्त एकाच सामन्यातल्या!

ब्रॅडमन यांचा विक्रम सचिन मोडूच शकत नाही, कारण ब्रॅडमन यांनी तो अत्यंत कमी सामने खेळून केलेला आहे. पण व्यक्तीपूजकांनी त्यासाठी सोयीस्कर असे निकष तयार केले आहेत. अनेकदा वाईट खेळूनही त्याला टीम बाहेरचा रस्ता दाखवला नाही,मात्र दुसरा एखादा खेळाडू एकाच सामन्यात नीट खेळू शकला नाही तर त्याला लगेच काढून टाकण्याची तत्परता बीसीसीआय आणि निवड समितीने दाखवली आहे. थोडक्यात काय तर सचिन हा कृत्रिम विक्रमवीर आहे. झालेला नव्हे होऊ दिलेला!

मंगेश वाघमारे ,पुणे
email- mangeshwaghmare91@yahoo.in

2 comments:

  1. vichar aani vikar yamadhe keval shabdacha kinchit farak nahi tar to tumchyatil vivek jagrut thevanyatil aani na thevanyatil farak aahe... vichar vivekachya kasotivar badalata yetat vikar nahi.... tyamule virodh karayacha asel tar to vivekachya kasotivar sambarada tapasayala hava... baki tumhi sudnya aahatach.....

    ReplyDelete
  2. लेखक... तुम्ही लिहिलेला लेख हा खरा असू शकेल असे नाहीच... कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटच्या चेंडू वर षटकार मारणे फक्त धोनी जमू शकते... इतके सामने काय केले होते त्याने???? पूर्ण स्पर्धा खेळायची नाही, लगेच आउट होऊन निघून जायचे, आणि फायनल मध्ये अगोदर येऊन सगळे शॉट मारून सगळे क्रेडीट घेऊन जायचे.... हा विचार केला नाही काय? असो सांगायला बरेच काही आहे, पण ब्लोग वर सांगू शकत नाही, तसे बघाल तर सगळ्यांनाच संधी दिली गेली होती, का कोणी तेंडूलकर ला अजून पछाडले नाही,????

    ReplyDelete