Sunday, March 18, 2012

ध्रुपद गायनाने साजरा होणार गुढी पाडवा



गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढ्या तोरणे उभारून आपण या नवीन वर्षाचे स्वागत करत असतो. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे या सणाचा आनंद घेत नवीन वर्षात सत्कार्य करण्याचा संकल्प करत असतो. देशभर अनेक वेगवेगळ्या उपक्रमांनी हा सण साजरा केला जातो.

पुणे हे शहर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या पुणे शहरात गुढी पाड्व्या निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कार्यक्रम सर्वांनाच पाहायला, अनुभवायला मिळतात असे नाही.

समाजातील सर्व स्तरातील लोकांना असे सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य पाहता यावेत यासाठी गेली ३० वर्षे संस्कार भारती सातत्याने प्रयत्नशील आहे.


निमित्ताने संस्कार भारती संभाजी भागाच्यावतीने शनिवार, दि. २४ मार्च २०१२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोथरूड येथील हॅपी कॉलनीच्या सभागृहात ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर आणि त्यांच्या शिष्यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित या नवीन वर्षाचे स्वागत करूयात.


सारंग मोहन कुलकर्णी

email-sarangmkul@gmail.com

1 comment: