Saturday, August 25, 2012

रविवार 'चिंटू' कार व चित्रकार चारुहास पंडित यांच्या सोबत




' अक्षर मानव ' च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'एक रविवार एक चित्रकार ' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर रविवारी एक नवा आणि नामवंत चित्रकार आपल्या शैलीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधेल, काही प्रात्याक्षिके चित्रकार करून दाखवेल आणि विद्यार्थाकडूनही करून घेईल. हा उपक्रम सलग सात रविवार चालणार आहे.

या उपक्रमाला १९ ऑगस्टच्या रविवार पासून सुरुवात झालेली आहे. पहिल्या रविवारी चित्रकार रविमुकुल यांनी विद्यार्थ्यांच्शी संवाद साधला व त्यांच्या चीत्राशैलीबाद्द्ल चे बारकावे सांगितले आता दुस-या रविवारी 'चिंटू'चे निर्माते व प्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित हे मुलांशी संवाद साधतील.
अतिशय खेळीमेळीच्या आणि मोकळ्या वातावरणात मुलांना चित्रकलेचा निखळ आनंद देणारा हा उपक्रम आहे.

मेहबूब शेख, ल. म. कडू, देविदास पेशवे, अनिल उपळेकर, गिरीश सहस्त्रबुद्धे हे नामवंत चित्रकार अनुक्रमे २ सप्टेंबर, ९ सप्टेंबर, १६ सप्टेंबर, २३ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर या उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. आठव्या रविवारी मुलांची चित्रकलेची स्पर्धा घेतली जाईल आणि उत्कृष्ट चित्रकारांना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.


स्थळ : श्री शिवाजी मराठा संस्थेचे जिजामाता मुलींचे हायस्कूल , ४२५ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरीच्या समोरची गल्ली, शिवाजी रस्त्याजवळ,
पुणे - ४११००२
दिनांक : रविवार, २६ ऑगस्ट २०१२
वेळ : सकाळी १० ते १

------

हेतू काय ?
या उपक्रमाला पुण्यातील शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील विविध शाळांमधील ९ ते १५ या वयोगटातील १०० विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे.
दर रविवारी चित्रकार नवे असतील विद्यार्थी मात्र तेच असतील. मुलांमध्ये चित्रकला या विषयाची आस्था वाढावी, त्यांच्यातील चित्रकाराला चालना मिळावी, चित्रकलेची समाज वाढावी, चित्रकलेचा व्यावसायिक उपयोग त्यांना कळावा आणि चित्रकलेचा सलग संस्कार मुलांवर व्हावा, हा हेतू यामागे आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आलेले नाही.
-------
चारुहास पंडित यांच्याविषयी -
चिंटू या हास्य चित्र मालिकेचे ते सहनिर्माते आहेत. नियतकालिक व पुस्तकांसाठी त्यांनी अनेक रेखाटणे काढली आहेत. तसेच काष्ठ चित्र संकल्पना मांडणारे ते एकमेव कलाकार आहेत.

No comments:

Post a Comment