Sunday, July 22, 2012

संगीत विद्याहरण शताब्दी- नाट्यसंगीत मेजवानी


किर्लोस्कर नाट्यगृह (जुने) : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या "विद्याहरण'चा पहिला प्रयोग 1913 मध्ये पुण्यात झाला, त्या वेळचे हे दृश्‍य. डावीकडून स्त्री-वेशात बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे.
-----------------------------------------------

नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या संगीत विद्याहरण या नाटकाचे शताब्दी वर्ष जून २०१२ पासुन सुरु झाले. या निमित्ताने डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठा, नवी दिल्ली व पुणे शाखा याच्या वतीने या नाटकातील ३५ पदे सादर करण्याचा कार्यक्रम पुण्याच्या भरत नाट्य मंदीरात होत आहे.
पं. सुहास व्यास आणि कै.वसंतराव देशपांडे यांचे सुपुत्र विजय (बापू) देशपांडे यांच्या उपस्थितीत
२८ जुलै १२ रोजी सायं. ५ वाजता योजिलेल्या नाट्यसंगीताच्या मैफलीत पदे सादर करणार आहेत..
सुरेश साखवळकर, रवीन्द्र कुलकर्णी, सीमा रानडे, अतुल खांडेकर, अर्पिता वैशंपायन आणि कल्याणी पोतदार-जोशी.

महेश पाटणकर आणि अमृता मातवणकर हे सूत्रधार नटीच्या रुपात दिसणार आहे.

तर साथसंगत लाभणार आहे जयराम पोतदार ( यांची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि ऑर्गनॉस साथ). विद्यानंद देशपांडे (तबला) आणि व्हायोलीनची साथ आहे प्रमोद जांभेकर यांची.

contact_ Jayram Potdar, Pune
mob. 9326060075
MOb- 942294943001


लोकमान्यांचे शिष्य नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या लेखणीतून आकाराला आलेले... "विद्या मिळवा; पण परत मायभूमीत या' हा संदेश देणारे... पंडित भास्करबुवा बखले, बालगंधर्व या दिग्गजांच्या चालींनी सजलेले... आणि ब्रिटिशांच्या संस्कृतीवर टीका करणारे "विद्याहरण'... हे संगीत नाटक यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

आपली मुले परदेशात जातात. वेगवेगळ्या पदव्या घेतात आणि तेथील संस्कृतीला, राहणीमानाला प्रभावित होऊन ती तिथेच स्थायिक होतात... ही बहुसंख्य भारतीय तरुणांची मानसिकता आहे. यावर "विद्याहरण'च्या माध्यमातून खाडिलकरांनी भाष्य केले. "संगीत मानापमान'नंतर त्यांनी लिहिलेले हे दुसरे नाटक आहे. किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे ते 31 मे 1913 रोजी रंगभूमीवर आले. याचा पहिला प्रयोग पुण्यातच किर्लोस्कर नाट्यगृहात झाला. यात खुद्द बालगंधर्वांनी देवयानीची भूमिका, तर कृष्णराव गोरे यांनी शुक्राचार्याची भूमिका केली होती. गोविंदराव टेंबेंनी कच, तर गणपतराव बोडसांनी शिष्यवराची भूमिका साकारली होती. नाटकाचा विषय आणि या दिग्गजांच्या अभिनयामुळे "विद्याहरण'चे अल्पावधीतच अनेक प्रयोग झाले. पुढे विविध नाट्य कंपन्यांनी याचे प्रयोग केले.

No comments:

Post a Comment