Sunday, June 24, 2012

शास्त्रीय संगीताचा पदविका अभ्यासक्रम पुण्यात

आर्य संगीत प्रसारक मंडळाने शास्त्रीय संगीतातील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे.

या अभ्यासक्रमासाठी दहा वर्षे पूर्ण आणि पाचवी उत्तीर्ण अशी प्रवेश पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग आठवड्यातून तीन वेळा सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत असतील. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष पुरविता यावे, यासाठी एका वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या केवळ पाच एवढीच मर्यादित ठेवण्यात आली असल्याची माहिती सवाई गंधर्व संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद कंदलगावकर यांनी दिली.

भूप, यमन, भिमपलास असे काही महत्त्वाचे राग विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात शिकविले जाणार आहेत. नोट्ससह प्रसिद्ध कलावंतांनी सादर केलेल्या कला दृक-श्राव्य माध्यमातून पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे, असेही कंदलगावकर यांनी सांगितले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14379672.cms

No comments:

Post a Comment