Wednesday, June 6, 2012

'पाऊसवाट` मधून मला जीवनाच्या हाका ऐकू आल्याद.भिं.चे स्पष्ट मत

`प्रत्येकामध्ये एक स्पंद असतो, तो स्पंद म्हणजे वाड़मयीन आत्मनिष्ठा. केदारच्या लेखनामध्ये चिंतन, संवेदना आणि कल्पकतेचे स्पंद आहेत. हे वाचत असताना मला त्यातून जीवनाच्या हाका ऐकू आल्या,-'पाऊसवाट - एक कोलाज' या पुस्तकाचे प्रकाशन करताना द.भि.कुलकर्णी यांनी हे स्पष्टपणे मान्य केले.

केदार केसकर यांनी लिहिलेल्या व कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'पाऊसवाट - एक कोलाज' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. ३ जून २०१२ रोजी ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्त झाले. प्रकाशनाचे अध्यक्षस्थान संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनी भूषविले. डॉ. शोभा अभ्यंकर या वेळी प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. सुधीर मोघे, मंगला गोडबोले, पं. संजीव अभ्यंकर, आसावरी काकडे असे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.


आनंद मोडक म्हणाले, उत्कटतेची तहान केदारला रसरशीतपणे व्यक्त होण्यास भाग पाडत आहे. ही अपूर्णता आणि अस्वस्थता अशीच राहिली तरच कलावंतामधील लसलसता कोंब वाढत राहिल.

देवयानी कुलकर्णी - अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले.

1 comment:

  1. Good luck Kedar... I read your book and am amazed the way you have written it. Highly intensive! Congrats!

    Avinash Lele

    ReplyDelete