Wednesday, May 30, 2012

`आरोग्य संगीत`-सुरेल,दर्जदार आणि वेगळा


जिवनात संगीताचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आणि हाच विषय घेऊन `आरोग्य संगीत` या कार्यक्रमाचे `सांस्कृतिक पुणे`च्या वतीने नुकतेच पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले. कोल्हापूरचे श्री. दिलिप गुणे यांच्या या संकल्पनेवर आखलेला हा अत्यंत सुरेल व दर्जदार होता यात शंकाच नाही. एक वेगळा आणि कोल्हापूरातल्या या कलावंताचा आविष्कार अनुभवण्याची संधी या निमित्ताने आली याचा अधिक आनंद होतो. विविध राग घेऊन त्यावर विशिष्ट रागाचा त्या त्या रोगासाठी होणार उपयोग सांगत हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार झाला.

बैरागी भेरव- या रागातील वैराग्याची भावना.
अहिर भैरव मधिल आर्त स्वर ह्दयरोग आणि उच्चरक्तदाब नियंत्रणासाठी उपयोगी असणारा.
शिवरंजनी- सोरायसिस वर उपयोगी
मधुवंती-कफ कमी होण्यासाठी
पहाडी – जुनाट सर्दी, कफ, खोकली यासाठी उपयुक्त
यमन- नेराश्य, मनोविकार आणि आमवातावर गुणकारी, डिप्रेशन, हार्मोनल असंतुलन.
सारंग- हायपर टेन्शन
भिमपलास- मनाच्या शांततेसाठी
हंसध्वनी- निद्रनाश, मानसिक दबाव यासाठी उपयुक्त.

अशा रागांनी अनेक रोगावर उपचार होऊ शकतो. याबाबतचे वैद्यकीय विवेचन केले डॉ. केतकी कौजलगी यांनी...तर वेगळ्यापध्दतीचे निवेदन करून या कार्यक्रमात अनेक विध रांगांशी संबंधीत आणि संगीताविषयक माहिती आपल्या प्रभावी शब्दातून व्यक्त केली ती मंगेश वाघमारे यांनी.

एक वेगळ्या प्रकारचा सांगेतिक अनुभूती यातून रसिकांना मिळाली.

गायक प्रल्हाद जाधव आणि गायिका स्वाती नाकील यांनी ओंकार स्वरुपा, अलबेला साजन आयो, सांज ढले गगन तले.. अशी अनेक गीते आपल्या सुरेल आवाजात सादर केली.

या कार्य़क्रमाचे संगीत संयोजक आणि बासरी वादक सचिन जगताप यानी स्वतःला मधुमेह असुनही राग संगीताने आपल्यावर काय परिणाम झाला ते सांगून याचे महत्व पटवून देताना..स्वतःच्या कलेचा सुंदर पगडा सर्वकार्य़क्रममभर सहजपणे मिरविला. व्हायोलीन व सतार वादक केदार गुळवणी आमि सचिन जगताप यांनी बहारोंसे फूल बरसाओ, जाने कहॉं गये वो दिन, लग जा गले, जा रे हट नटखट, गोविंदा आला रे , तुम पास आये, सायोनारा, पंख होते तो.. अशी एकाहून एक सरस गीते सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली.

तबल्याची साथ करणारे प्रशांत देसाई. ढोलक, ढोलकी व साईड रिदमवर सचिन पन्हाळकर. ऑक्टोपॅडची साथ करणारे किरण ठाणेदार. सिंथेसायझरसाठी शिवाजी सुतार या सर्वच कोल्हापूरच्या कलावंतांनी कार्यक्रमाची रंगत अधिक वाढविली. याचे दुसरे एक वैशिष्ठ्य म्हणजे, केवळ गाणी..राग नव्हे..तर तालवाद्यातून विविध सुरावटी सादर करुन कार्यक्रमाचे वेगळेपण जपत वादनाची कमालही अनुभवायला मिळाली.

सर्वच कलाकारांच्या एकत्रित वादनामध्ये अत्यंत सुसूत्रता, वादनातील सच्चेपणा, सुरेलपणा, आपलेपणा खरंच वाखाणण्याजोगा होता.

कोल्हापूरच्या `फायटो फार्मा आर्ट सर्कल` आयोजित आणि `संस्कार जीवनगाणे` प्रस्तुत `आरोग्य संगीत` या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. दिनेश गुणे यांची होती..

या सुरेल कार्यक्रमासाठी `सांस्कृतिक पुणे`चे सुभाष इनामदार यांचे मोलाचे सहाकार्य लाभले.सौ. चारुशीला गोसावी, पुणे

charusheelagosavi@gmail.com

No comments:

Post a Comment