Wednesday, May 9, 2012

`मुक्ताई- एक मुक्ताविष्कारचा` दोनशेवा प्रयोग मंगळवारी




बारावर्षापूर्वी सुरु केलेला हा एक मुक्ताविष्कार आजच्या टप्प्यावर दोनशेव्या प्रयोगापर्यतची वाटचाल यशस्वी करत आहे. प्रचिती प्रशांत सुरु हा मुक्ताईच्या भूमिकेतून मुक्ताईच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून सांगत तिच्या श्रेष्ठत्वाची कहाणी या सादरीकरणात कथीत करतात. अवघे अठरा वर्षाचे आयुष्य लाभलेली ही मुक्ताई...सर्वांच्या दृष्टीने अलोकिक आहे. मुक्ताईचा संपूर्ण जीवनपटच यातून सिध्द होतो.
मंगळवार दि. १५ मे २०१२ला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुक्तनाट्याचा प्रयोग भरत नाट्य मंदिरात संध्याकाळी सहा वाजता होत आहे. `मुक्ताई`च्या डिव्हीडीचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकरांच्या हस्ते होणार आहे.
मुक्ताईचे संहिता लेखन केले आहे वैद्य सौ. प्रफुल्लता सुरु यांनी तर दिग्दर्शन संकल्पना आहे वैद्य प्रशान्त अ. सुरु यांची. भारतभर अनेकविध ठिकाणी या मुक्तआविष्काराचे प्रयोग तर झालेच पण पाच खंडातही याची प्रतिती अनेक रसिकांनी घेतली आहे.
ज्या पुण्यातल्या भरत नाट्य मंदिरात २९ मे २००० ला पहिल्या प्रयोगाची नांदी झाली त्याच भरत मध्ये दोनशेवा प्रयोग होणे हे भाग्यच. मंगळवारी होणारा हा प्रयोग सर्वासाठी विनामूल्य आहे.

No comments:

Post a Comment