Monday, July 11, 2016

पालखी निघाली वैकुंठा....डॉ. रा. चिं. ढेरे यांचे निधन

पुण्यातून जुलैच्या १ तारखेला  पालखी मुक्काम हलला  ..मात्र पंढरपूरच्या विठूमाऊलीवर लेखन करून आपली संस्कृती आणि परंपरा संशोधनपर पुस्तक लिहणारे इतिहास संशोधक आणि संतसाहित्याचे अभ्य़ासक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाची बातमी यावी हा कोणता योग...
 पालखी  गुरूवारी पुण्यात  मुक्कामास होती....ढेरे अखेरचा श्वास घेत होते..
शुक्रवारी १ जुलौला पालखी पंढरपूरच्या दिशेने पालखी पुण्यातून हलली..रा. चि. ऊर्फ आण्णा ढेरे यांची कार्यसमाप्ती झाली..

पांढरा लेंगा आणि फुल नेहरू  शर्ट या अतिशय साध्या पण सुटसुटीत वेशात नेहमी ते बाजीराव रस्त्यावरच्या जुनी पुस्तके विकणा-या विक्रेत्याकडे जुन्या पोथ्या.लोककलांविषयक पुस्तके..जुन्या परंपरा असलेली ग्रंथसंपदा पाहण्यासाठी अगदी नियमाने सहकारनगर वरून येताना दिसत असत..
मात्र गेले दीडएक वर्ष एक बाजू थोडी अधू झाल्याने चालणे थांबले..
घरी वाचन, लेखन आणि अगदी काल पर्यतही नवीन पुस्तकाची मुद्रित प्रत तपासण्यात ते गर्क असायचे..
कधी घरी गेले तर आता आम्ही आशार्वादापूरते असे म्हणायचे..


त्यांनी संशोधन, लेखन आणि सतत भारतीय संस्कृतीची परंपरा सांगणारी पुस्तके लिहली..
अतिशय साधी रहाणी..आणि उच्च विचारसरणी स्वतःच्या आचरणात त्यांनी कायम ठेवली..

आपल्या लेखनाची..संशोधनाची परंपरा त्यांनी आपल्या दोन्ही कन्यका कवीयत्री अरूणा ढेरे आणि लेखिका वर्षा गजेंद्रगडकर य़ांचेकडे सोपविली आहे..
मुलगा मिलिंद हा उत्तम छायाचित्रकार..

अखेरच्या दिवशीही कार्यतप्तर राहून भारतीय संस्कृतीची पताका फडकवत ठेवली..

आता ही पालखी त्या ज्ञानयोग्याच्या दारी वैकुंठाच्या विद्युत दाहिनीतून दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी निघाली..

त्यांच्या संशौधन कार्याची आणि पुस्तकांची पुन्हा नव्याने उजडळणी होईल..पण ते आपल्यातून निघून गेले..हे सत्य पचवायला अवघड असले तरी ही वस्तुस्थिती आहे..

त्यांचा वारसा अरूणा आणि वर्षो दोघी पुढे नेतील.
त्य़ांना बळ देणे हे समाजाचे काम आहे..

आण्णांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन..


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:

Post a Comment