Monday, December 14, 2015

बाबा आमटेंच्या १०१व्या जयंती निमित्त व्हायोलीन गाणार..
व्हायोलीन गाते तेव्हा..हा चारूशीला गोसावी यांच्या व्हायोलीनवरील लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम सांस्कृतिक पुणे www.culturalpune.blogspot.com .   यांच्या वतीने स्व. बाबा आमटे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त पुण्यात करीत आहोत. तो एस एम जोशी सभागृहात २६ डिसेंबर २०१५ ला संध्याकाळी पाच वाजता सर्वांसाठी विनामूल्य असेल..

हेमलकसा प्रकल्पाच्या मदतीसाठी तो खास आयोजित केला आहे. तो सर्वांसाठी  आहे..

निधी स्विकारण्यासाठी आमटे कुटुंबीयांपैकी अनिकेत आमटे उपस्थित राहणार आहेत.


फ्लॅश म्युझिक कंपनीच्या ज्येष्ठ कवीयत्री शांताबाई शेळके यांच्या कवीतांविषयीच्या सुभाष इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीची सीडी ...असेन मी नसेन मी ...चे प्रकाशन याप्रसंगी ज्येष्ठ कवीयत्री व साहित्यिक अरूणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे

याच वेळी बाबा आमटे यांच्या कार्याची जवळून ओळख करण्यासाठी एकमहिना वास्तव्य करुन आमटे पतिपत्नीच्या कार्यावरुन प्रेरणा घेऊन त्यांच्यावर प्रतिकात्मक स्वरूपात पात्रे निर्माण करून आपल्या शैलीत गो. नी दांडेकर यांनी `आनंदवनभुवनी` ही कादंबरी लिहली..त्या कादंबरीचे नव्याने प्रकाशन `मृण्मयी` प्रकाशनाच्या वतीने अनिकेत आमटे यांच्या हस्ते या कार्यक्रमात बाबा आमटे यांच्या १०१व्या जयंती निमित्त ..इथे होणार आहे..हेही या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे.


लोकबिरादरी मित्र मंडळ, पुणे यांच्या सहकार्याने होणा-या या कार्यक्रमात ज्येष्ट समीक्षक मा. कृ. पारधी यांचा ९६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कारहा करण्यात येणार आहे..
याप्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. वीणा देव यांचीही सहभाग असणार आहे.आपल्या सारख्या रसिकांची आणि दानशूरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.संपर्क- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com


9552596276

No comments:

Post a Comment