Tuesday, August 15, 2017

राहून गेलेली गोष्ट - फैय्याज

वयाच्या सोळाव्या वषीर् सोलापूर सोडून मुंबईत आले. सुमती धनवटेलिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दशिर्त 'गीत गायिले आसवांनी' हे माझं पहिलं नाटक. त्यातली माझी मंझरची भूमिका नावाजली गेली. माझ्या गाण्याने रसिक भारावले. नाट्य-समीक्षकांनीही गहिरा स्वरविलास, भरदार आवाज अशा उपाध्या माझ्या आवाजाला दिल्या आणि पहिल्याच नाटकात गायिका अभिनेत्री म्हणून मी नावारूपाला आले. त्यानंतर रंगभूमीवर आलेल्या 'कट्यार काळजात घुसली', 'संत गोरा कुंभार', 'होनाजी बाळा', 'वीज म्हणाली धरतीला' अशा संगीताची पार्श्वभूमी असलेल्या नाटकांनी माझी ही ओळख अधिकच ठळक केली. आजही गायिका अभिनेत्री म्हणून कलारसिक मला नावाजतात आणि ही ओळख मलाही मनोमन सुखावून जाते.

सुखाच्या या हिंदोळ्यावर असतानाच तो झोका पुन्हा सोलापुरात कधी जातो, तेच कळत नाही आणि मग अचानक बारा-तेरा वर्षांची मेळ्यात-कलापथकात काम करणारी मीच मला नव्याने गवसते. गाण्याची-नृत्याची आवड असलेली फैय्याज

माझी ही आवड लक्षात घेऊनच आजीने गाण्यासाठी राम जालिहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम लावलेली; तर नृत्यासाठी मास्टर हसन(कथ्थक) आणि कट्टीबंधुंची(भरतनाट्यम). नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरच्या संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खाँ, बेगम अख्तर यांच्यासारख्या महान गायकांची गायकी कानावर पडलेली. मग दिवसच्या दिवस त्याच गायकीत रममाण झालेली फय्याज. कधी तरी या थोर गायकांच्या मैफलींचं सोलापुरात आयोजन झालेलं. पण भरमसाठ तिकिटामुळे बडे गुलामअली खाँच्या मैफलीला मुकलेली फय्याज. मात्र शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानगळ हायस्कूल-मध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफील दुरून का होईना, ऐकायला मिळालेली आणि त्या जादुभऱ्या सुरांनी कायमची भारावून गेलेली फय्याज. किंबहुना बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतलेली फय्याज. परिणामी ही गायकी कधी तरी शिकता येईल का असा सवाल बारा-तेराच्या वयात स्वत:लाच करणारी फय्याज...

... आणि अचानक अशी संधी मला गवसली. पहिल्याच नाटकाने गायिका अभिनेत्री अशी माझी ओळख झाली. त्यामुळे नंतर तशाच भूमिका मिळत गेल्या. अर्थात यामुळे पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद अभिषेकी यांच्याशी परिचय झाला आणि मला त्यांच्याकडून गायनाचे धडे मिळू लागले. परंतु या साऱ्यांनाच मला बेगम अख्तर यांच्या गाण्याचं असलेलं प्रेम ठाऊक होतं. त्यामुळेच एकदा अभिषेकीबुवा सत्येंदभाई त्रिवेदी या आपल्या संगीतातील ददीर् मित्राला म्हणाले-'कभी बेगमजी बम्बई में आयेगी, तो इस लडकीकी उनसे पहेचान करा देना.'

त्रिवेदीजी म्हणजे गायक-वादकांच्या घरी हक्काचा राबता असलेली अफलातून व्यक्ती. मग त्या निर्मलादेवी असोत किंवा मेनकाबाई शिरोडकर असोत. साऱ्यांशी त्यांची सलगीची जान-पहेचान. आणि एक दिवस त्रिवेदीजी खरोखरच आले आणि मला म्हणाले-'चलो अख्तरीबाईजी आयी है.'

त्यांच्या त्या बोलण्यानेच छातीत धडधडायला लागलं. ज्यांचं सतत ध्यान केलं, त्यांना भेटायचं म्हटल्यावर मात्र माझ्या अंगावर काटा आला. मी चुपचाप त्रिवेदींबरोबर चालायला सुरुवात केली. बेगम अख्तर मुंबईत आल्या की कायम मरिन लाईन्सवरच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलात उतरत असत. आम्ही त्या हॉटेलवर गेलो. त्रिवेदीजींनी खालून फोन लावला आणि अख्तरीबाईंना म्हणाले-'मी फय्याजला घेऊन आलोय. तिला तुम्हाला भेटायचंय.'

' तिला तुम्हाला भेटायचंय' ऐकून बाई गडबडल्या. कारण आमच्यात फय्याज हे नाव मुलाचं असतं. म्हणून अख्तरीबाईंनी त्रिवेदीजींना विचारलं, 'तुम्ही कुणा मुलाला घेऊन आला आहात का?' पण मग त्रिवेदीजी म्हणाले,'नही, ये फय्याज लडकी ही है' आणि आम्ही वर सहाव्या मजल्यावर अख्तरीबाईंच्या रुमवर गेलो. बाईंनी मला वरून खालपर्र्यंत बारीक नजरेने न्याहाळलं. म्हणाल्या - 'कुछ सुनाओगी?' आणि साथीला स्वत:च पेटी घेऊन बसल्यादेखील!

माझ्या पोटात खड्डा पडला. मनात आलं, 'आजवर ज्यांच्या गझल-ठुमरीची पारायणं केली, त्यांना काय ऐकवायचं?' मग धीर करून त्यांचीच एक गझल म्हटली. गझल संपली. क्षण-दोन क्षण मधे गेले असतील नसतील, बाईंचे खणखणीत शब्द कानावर पडले- 'त्रिवेदीजी क्या गजब गाया लडकीने. खुदाने क्या नियामत दी है!'

त्यानंतर मग बेगम अख्तरांशी गुरू-शिष्याचं नातं जुळलं ते कायमचं. त्यावेळी 'कट्यार काळजात घुसली'चे प्रयोग जोरात सुरू होते. म्हणून मी बेगमजींना प्रयोग बघायला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनीही ते मनापासून स्वीकारलं आणि एक दिवस आल्या 'कट्यार...' पाहायला. तिथे प्रयोगाआधीच त्यांची आणि पं. वसंतराव देशपांडेंशी भेट झाली. ते एकमेकांना आधीपासूनच चांगले ओळखत होते. वसंतरावांनी आवाज देऊन मला जवळ बोलावलं. माझ्याकडे बोट दाखवत बेगमजींना म्हणाले, 'ये तुम्हे और तुम्हारे गायकी को बहोत चाहती है. इसे कुछ सिखाओ.' यावर बेगमजींनी आनंदाने मान डोलावली आणि त्या 'कट्यार...'चा प्रयोग बघायला बसल्या.

' कट्यारचा...' पहिला अंक पावणेदोन तासाचा असायचा. बाईंना तर थोड्या थोड्या वेळाने सिगारेट ओढायची सवय. पण बाई निमूट पावणेदोन तास बसून होत्या. अंक संपल्यावर वसंतराव त्यांना भेटायला खाली गेले. तर म्हणाल्या, 'पहले दो कश मारके आती हू. बादमें बातें करते है.' आणि शिवाजी मंदिरच्या बाहेर जाऊन (तेव्हा शिवाजी मंदिर खुलं होतं) दोनच मिनिटात त्या परत आल्या. मग नाटकाबद्दल पंडितजींच्या-माझ्या गाण्याबद्दल भरभरून बोलल्या. माझ्या 'लागी करेजवाँ कट््यार' गाण्याने तर बेगमजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. 'कट्यार' बेगजींना एवढं आवडलं की नंतर त्यांनी ते सात-आठ वेळा पाहिलं.

या भेटींमध्ये मी बेगमजींच्या खूप जवळ गेले. 'कट्यार...'नंतरची माझी 'वीज म्हणाली धरतीला', 'होनाजी बाळा' अशी बहुतेक संगीत नाटलं बेगमजींनी पाहिली. मुख्य म्हणजे नंतर जेव्हा जेव्हा त्या कार्यक्रमांसाठी किंवा आकाशवाणीवर रेकॉडिर्र्ंगसाठी मुंबईला येत, तेव्हा हक्काने मला बोलावून घेत. त्यांच्याबरोबर मागे तंबोरा घेऊन साथीला बसवत. एवढंंच नाही, तर अनेकदा एखादी सुरावट मुद्दाम मध्येच सोडून देत आणि ती मला उचलायला सांगत.

एकप्रकारे माझं हे त्यांच्याकडे चाललेलं संगीतशिक्षणच होतं. ऊर्दू शब्द नजाकतीने कसे उच्चारायचे, त्यांची फेक कशी करायची, आवाजाचा लगाव... असं बरंच काही त्यांच्या मागे बसूनच मी शिकले. अशा त्यांच्या अनेक जाहीर-खाजगी मैफलीत मी त्यांना साथ केलीय. त्यांच्या या मैफली ऐकायला तेव्हा संगीतकार जयदेव, मदनमोहन, नगिर्स अशी बडीबडी मंडळी यायची. त्यांच्यासमोर गाताना अख्तरीबाई देहभान हरपून गझल-ठुमरी गायच्या आणि ते माझ्या पथ्यावरच पडायचं. मी जेवढं आत्मसात करता येईल तेेवढं करायचे. अर्थात हे सारं एकलव्य वृत्तीने चाललेलं असायचं.

... त्यांच्याबरोबरच्या कार्यक्रमांचा असा सिलसिला सुरू असतानाच एक दिवस मी धीर करून त्यांना म्हणाले, 'बेगमजी मुझे आपके पास गाना सिखना है.'

क्षणाचाही विलंब न लावता त्या म्हणाल्या, 'जरूर, क्यों नही? मेरी बेटी बनो और गाना सिखने के लिये लखनौ आ जाओ.'

... पण मला त्यांची बेटी नाही बनता आलं, लखनौला नाही जाता आलं. माझ्या मागे तीन भावंडं होती. त्यांची जबाबदारी माझ्यावर होती. दोन बहिणींची लग्नं करायची होती, भावाचं शिक्षण करायचं होतं. तसंच नाही म्हटलं तरी गायिका-अभिनेत्री म्हणून काहीएक कारकीर्द मागीर् लागली होती. ते सारं इथे सोडून लखनौला जाणं परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. वसंतराव, अभिषेकीबुवा सारेच जा-जा सांगत होते. पण नाही जाता आलं, एवढं खरं!

तेव्हा वय विशी-बाविशीचंच होतं. जाऊन पाच वर्षं शिकून आले असते, तरी आजच्या फय्याजची कारकीर्द काही वेगळीच घडली असती. कारकीर्दही एकवेळ बाजूला ठेवू. संधी असतानाही मला बेगम अख्तर यांच्याकडे रीतसर गाणं शिकता आलं नाही, याचीच खंत आहे आणि ती आजन्म राहील.

No comments:

Post a Comment